शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

बाजार समिती निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, राज्यभरात शेतकरी मतदार याद्या नोंदणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:04 PM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील निवडणुकीस पात्र असणाºया बाजार समितीच्या निवडणुका आणखी काही महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्देराज्यभरात शेतकरी सभासद नोंदणीची प्रक्रिया सुरूशेतकºयांना बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी मतदानाचा अधिकार देणारे विधेयक मंजूरनजीकच्या काळात या निवडणुका अपेक्षित वेळेत होतीलसौरऊर्जा निर्मितीवर देणार भर : सहकारमंत्री देशमुख

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील निवडणुकीस पात्र असणाºया बाजार समितीच्या निवडणुका आणखी काही महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़ सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनीच सोलापुरात बोलताना तसे संकेत दिले़ राज्यभरात शेतकरी सभासद नोंदणीची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल़ त्यामुळे वेळेत निवडणुका होण्याबाबत पणनमंत्र्यांनी साशंकता व्यक्त केली़ विधानसभा मतदारसंघातील विकास कामांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर बाजार समितीच्या संभाव्य निवडणुकीबाबत हे भाष्य केले़ बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सात-बारा उताराधारक शेतकºयांना बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी मतदानाचा अधिकार देणारे विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे़ त्याचे कायद्यात रुपांतर तसेच निवडणूक नियमावली आदी प्रक्रिया सध्या सुरु आहे़ मतदार याद्या बनवण्याचे काम क्लिस्ट आहे़ एका सोलापूर बाजार समितीचा हा विषय नाही़ राज्यभरात अनेक बाजार समित्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आहेत़ अंतिम मतदार यादी तयार झाल्याशिवाय निवडणूक घेता येणार नाही़ त्यासाठी आणखी विलंब लागेल़ त्यामुळे नजीकच्या काळात या निवडणुका अपेक्षित वेळेत होतील, असे दिसत नाही़ मंद्रुप तालुका निर्मितीची मागणी आहे; मात्र तालुक्यासाठी आवश्यक ती कार्यालये, सोयी-सुविधा मंद्रुपमध्ये निर्माण झाल्याशिवाय तालुका निर्मितीची मागणी चुकीची ठरेल़ त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत़ पूरक वातावरण निर्माण केले जात आहे़ नव्या इमारती उभारण्यासाठी प्रस्ताव देऊन त्याची पूर्तता झाल्यानंतर मंद्रुप तालुका निर्मितीची मागणी करणे योग्य ठरेल़ अशी पुष्टी सहकारमंत्र्यांनी जोडली़ जिल्ह्यात वैरागसह काही तालुक्याचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहेत़ याकडेही लक्ष वेधले़ भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेजेस मंजुरीचा प्रस्ताव दिला आहे़ आतापर्यंत या विषयावर एकही मागणी अथवा प्रस्ताव शासनाकडे नव्हता़ त्याचे सर्वेक्षण झाले नाही़ तरीही वडापूर बंधाºयाचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ राजकीय दृष्टीने मांडला गेला़ प्रत्यक्षात प्रयत्न झाले नाहीत़ याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले़ सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमा  नदीवर टाकळी येथे तर सीना नदीवर वडगबाळ येथील पूल जीर्ण झाले आहेत़ वाहतूक वाढल्याने त्याचे नूतनीकरण होण्याची गरज आहे़ या दोन्ही पुलासह तिºहे, बेगमपूर पुलाचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली़ मंद्रुप पाणीपुरवठा योजनेला मंजुरी, एमआयडीसीसाठी जलसंपदा खात्याकडून पाण्याची परवानगी, गारमेंट पार्क, होटगी येथे ऊस संशोधन केंद्राला मंजुरी आदी कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती सहकारमंत्र्यांनी दिली़ या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर सोलापूरचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम उपस्थित होते़ ----------------------सौरऊर्जा निर्मितीवर देणार भर- दक्षिण सोलापूर तालुक्यात सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांना गती देण्याचा मानस सहकारमंत्री देशमुख यांनी व्यक्त केला़ शेतकºयांना शासकीय अनुदानावर सौरपंप मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून यात नदीकाठासह सर्वच शेतकºयांचा वीजपुरवठा खंडित होण्याने नुकसान होणार नाही़ शेतक ºयांची मानसिकता तयार करण्यासह त्यांना सौरपंप बसवणे, शासकीय अनुदान मिळवून देणे यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ ----------------------विधायक कामांची अपेक्षा - तालुक्याच्या राजकारणाशी माझे देणे-घेणे नाही़ सध्या मी लोकप्रतिनिधी आहे़ मला गट-तट, सुडाचे राजकारण या विषयात रस नाही़ विकासकामांची चर्चा व्हायला हवी असे वाटते़ पत्रकारांनी राजकीय विषयावर प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्येकांनी तालुक्याच्या विकासाचे दोन विषय सुचवावेत, त्याचा माझ्याकडून पाठपुरावा करून घ्यावा़ यातून आपल्या परिसराच्या विकासाला गती देऊ या, अशी अपेक्षावजा सूचना सहकारमंत्र्यांनी उपस्थित पत्रकारांना केली़ 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSolapurसोलापूरElectionनिवडणूक