अक्कलकोट एमआयडीसी येथे मर्दा टेक्सटाईल गोडावुनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 13:12 IST2018-12-19T13:11:37+5:302018-12-19T13:12:22+5:30
लाखो रूपयाचा माल जळुन खाक : १८ गाड्यांनी आगीवर केला पाण्याचा मारा

अक्कलकोट एमआयडीसी येथे मर्दा टेक्सटाईल गोडावुनला आग
सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील मर्दा टेक्सटाईल गोडावुनला आग लागुन लाखो रूपयाचा माल जळुन खाक झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी ११.३0 वाजता घडला.
बुधवार असल्याने एमआयडीसी येथील कारखान्यांना सुट्टी होती. मर्दा टेक्सटाईलच्या गोडावुनला अचानक आग लागली. वाºयामुळे आगीने रूद्ररूप धारण केले. धुराचे लोळ एमआरडीसी परिसरता पसरू लागले. कारखान्यात कोणी नसल्याने लवकर कोणाच्या लक्ष्यात आले नाही. धुराचे लोळ पाहुन लोक गोडावुनच्या दिशेने धावु लागले.
स्थानिक लोकांनी आग्नीशामक दलास संपर्क साधुन माहिती दिली. प्रथमत: आग्नीशामक दलाच्या दोन गाड्या या आग विझवण्यासाठी आल्या. आग आटोक्यात येत नसल्याने आणखी गाड्या बोलावण्यात आल्या. एकूण १८ गाड्यांनी पाण्याचा मारा करण्यात आला. गोडावुनमध्ये टॉवेल्स हा माल मोठ्या प्रमाणात होता. सर्व माल ज पत्र्याचे गोडावुन जळुन खाक झाले. तब्बल अडीच ते तीन तास आग विझवण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण समजु शकले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांची गर्दी कमी केली.