मंगळवेढ्यात मराठा समाज आक्रमक; ठिय्या मांडून केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 16:11 IST2021-05-06T16:11:17+5:302021-05-06T16:11:46+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

मंगळवेढ्यात मराठा समाज आक्रमक; ठिय्या मांडून केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध
सोलापूर - मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द केले. या निषेधार्थ मंगळवेढा शहरातील दामाजी चौक येथे ठिय्या मांडून निषेध आंदोलन करम्यात आले.
यावेळी ठाकरे सरकार निष्क्रिय सरकार, राज्य सरकारचा निषेध , एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच लावकरात लवकर तत्काळ अधिवेशन बोलवून समिती स्थापन करून समाजाला न्याय देण्याचा काम राज्य सरकारने कराव असे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या आंदोलनात भाजपचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, विधानसभा आमदार समाधान आवताडे, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे, बाजार समिती सभावती सोमनाथ आवताडे, येताळा भगत, राजेंद्र सुरवसे, नागेश डोंगरे, सुदर्शन यादव, युवा मोर्चा अध्यक्ष सुशांत हजारे, द्यानेश्वर कोंडुभैरी, उमेश विभूते उपस्थित होते.