मराठा आरक्षण आंदोलन : शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे 5 जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 16:34 IST2018-09-02T16:34:36+5:302018-09-02T16:34:50+5:30
पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात एसटी बसवर दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक

मराठा आरक्षण आंदोलन : शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे 5 जण अटकेत
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात एसटी बसवर दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील केदार उमेश शिंदे (गोविंदपुरा), तर लक्ष्मी टाकळी येथे एसटी बस फोडल्याप्रकरणी आकाश श्रीकांत पवार (पंढरपूर), विकी दत्तात्रय झेंड (पंढरपूर), विनायक पोपट जाधव (पंढरपूर) व सोन्या उर्फ वैभव श्रीकांत कदम (पंढरपूर) व कासेगाव येथील गुन्ह्यात सचिन भारत कबाडे (पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे.