ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणी : कल्याणशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST2021-09-19T04:23:25+5:302021-09-19T04:23:25+5:30
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना या उपक्रमाला गतिमान करण्यासाठी महाआवास अभिमान राबविण्यात येत आहे. याच्या अनुषंगाने पंचायत समिती, ...

ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणी : कल्याणशेट्टी
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना या उपक्रमाला गतिमान करण्यासाठी महाआवास अभिमान राबविण्यात येत आहे. याच्या अनुषंगाने पंचायत समिती, अक्कलकोट येथे हे अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे क्ल्स्टर, ग्रामपंचायत व लाभार्थ्यांना आ. कल्याणशेट्टी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
यावेळी ऐवळे यांनी पंचायत समितीच्या आजपर्यंत झालेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सभापती आनंदराव सोनकांबळे, तसेच उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सभापती आनंदराव सोनकांबळे, उपसभापती प्रकाश हिप्परगी, पं. स. सदस्य राजकुमार बंदिछोडे, गटविकास अधिकारी बी. डी. ऐवळे, एस. बी. मठ, एस. एच. जमादार, भीमाशंकर तुळजापुरे, दयानंद परिचारक, प्रदीप पाटील, दयानंद बमनळ्ळी, वैष्णवी सलगरे, आर. एन. निकम, शंकर घुंगरे, आर. के. जाधव, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे, घरकुल विभाग अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व लाभार्थी उपस्थित होते.
----