'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे

By शीतलकुमार कांबळे | Updated: February 15, 2024 11:47 IST2024-02-15T11:45:30+5:302024-02-15T11:47:25+5:30

जरांगे पाटील पाच दिवसापासून एकही थेंब पाणी पिले नाही. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे.

Manoj Jarange Patil has been on hunger strike for five days for Maratha reservation. | 'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे

'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांपासून उपोषण चालु आहे. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य व आरोग्य चांगले लाभावे. लाखांचा पोशींदा जगू दे म्हणून पंढरपुरातील मराठा बांधवांनी श्री विठ्ठल - रुक्मिणीला साकडे घातले आहे.

जरांगे पाटील पाच दिवसापासून एकही थेंब पाणी पिले नाही. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालवली आहे. मराठा आरक्षण थोडे उशीराने मिळू दे, परंतु जरांगेंचा जीव वाचाव, त्यांना जिंवत ठेव. सरकारला सद्बुध्दी दे असे साकडे घातले असल्याचे किरण घाडगे यांनी सांगितले. यावेळी किरण घाडगे, दिपक वाडदेकर, संदिप मांडवे, सुभाष भोसले, अमोल आटकळे, प्रशांत झिंजूर्टे, स्वागत कदम, सुमित शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Manoj Jarange Patil has been on hunger strike for five days for Maratha reservation.