शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतीमालासाठीही मॉल संस्कृती रूजली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 3:28 PM

भारत शेतीप्रधान देश आहे.

भारत शेतीप्रधान देश आहे. आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलं वाक्य. परंतु, शेतीला प्राधान्य देणारी व्यवस्था मात्र इथे नाही, शेती पिकवताना शेतकºयाला होणाºया कष्टाचे महत्त्व एसीरूम शेअर करणाºयाला कसं कळेल. १० रू.ला किलोग्रॅम मिळणाºया टोमॅटोचे भाव वधारले की, आपले कान टवकारतात, परंतु त्याच टोमॅटोपासून बनलेल्या सॉसच्या पॉकेटमागच्या भरमसाठ किमती न पाहता मॉलचे गल्ले भरतो. आपल्याला जगण्यासाठी शेती व शेतीमालाचे अनन्य साधारण महत्त्व आहे हेच आपण विसरत चाललोय. फास्टफूडमधील पिझ्झा, बर्गर, वडा, भजी, दोसा, इडली, पावभाजीचा संबंध शेतीमालाशी नाही असे आपण कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणू शकतो.

रानातील ढेकळं फुटून पुन्हा ढेकळं बनेपर्यंत कोणकोणत्या क्रिया घडतात याची कल्पनासुद्धा नसेल यांना. जून महिन्याची धून चांगली वाजेल या आशेवर जगणाºया जुलै ते आॅक्टोबर ओलांडले तरी पाऊस नाही पडला तर शेतकºयाची काय अवस्था होते हे त्यालाच माहीत. अचानक कोसळणारा वादळी पाऊस, पिकांची रास होऊन धान्य गोणपाटात बंद होईपर्यंत निर्माण होणारी आस्मानी व सुलतानी संकटे आणि एवढी संकटे पेलूनही दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. अशाही परिस्थितीतून काढलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने तो आणखी मरणयातना सोसतो आहे़ भाजीपाला घेण्यासाठी परवा मंडई गेलो असतानाची घटना आहे.

एका माणसाभोवती गराडा घालून काही लोक मोठमोठ्या आवाजात बोलत होते. सहज लक्ष गेलं तर एक वयस्कर शेतकरी कोथिंबिरीने भरलेलं गोणपाट एकरकमी विकण्याचा प्रयत्न करत होता. गराडा घातलेले लोक अगदी दोन रूपयांपासून एकेक जुडी मागत होते. म्हटलं थोडं पाहावं काय घडतंय ते. त्या गर्दीतील संवाद काहीसे असे होते, एक जुडी दोन रूपयाला करून दे. एवढे लहान जुडी असतात का? आम्हाला नाही परवडत बाबा तुझे रेट. कस्टमर तर देतील का जास्त भाव? आम्हाला दिवसभर बसून विकावं लागतं इथं....... शेवटचं सांगतो पाचला एक जुडी भाव लावून दे...’ वाढलेली कलकल पाहून त्या वयस्कर शेतकºयाने पाच रूपयाला एक जुडी या भावाने भाजीपाल्याने भरलेले ते गोणपाट देऊन नाराज मनाने घरचा रस्ता धरला. हे सर्व मी बारकाईने पाहत होतो. भाजीपाल्याने भरलेले ते गोणपाट घेऊन तो दलाल आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसला.

माझं लक्ष होतंच तिकडं एकेक जुडी सोडून, एकाचे दोन जुडी करून तो जोरजोराने आवाज देऊ लागला, मेथी घ्या मेथी दहा रूपयाला एक मेथी.... आणि त्याच्याकडे भाजीला आलेली सुशिक्षितांची गर्दी वळली आणि मी सुन्न मनाने तिथून विचारांची फैरी स्वत:वरच झाडत निघालो. दिवसभर काबाडकष्ट करून पाच रूपयाला एक जुडी देऊन गेलेला शेतकरी आणि त्या जुडीतून पंधरा रुपये नफा कमवणारा दलाल... दोघेही माझ्या मनाला अस्थिर करून गेले.

आपण मॉलमध्ये जाऊन घेतलेल्या एका बिस्किटाच्या पॉकेटाची अथवा एका साबणाच्या वडीची देशभरात कुठेही सारखीच किंमत दिसेल. अगदी तसंच काहीसं शेतीमालाच्या बाबतीत घडलं तर काय बिघडणार आहे...?- आनंद घोडके(लेखक जि. प. शिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMarketबाजारFarmerशेतकरी