तेरा वर्षाच्या मुुलीला पळवून नेऊन मजनूचं लज्जास्पद वर्तन; बाललैंगिक छळाचा गुन्हा
By रवींद्र देशमुख | Updated: March 20, 2024 19:43 IST2024-03-20T19:43:09+5:302024-03-20T19:43:24+5:30
पिडितेच्या आई तक्रार : तरुणाविरुद्ध विनयभंग, बाललैंगिक छळाचा गुन्हा

तेरा वर्षाच्या मुुलीला पळवून नेऊन मजनूचं लज्जास्पद वर्तन; बाललैंगिक छळाचा गुन्हा
सोलापूर : तेरा वर्षाच्या मुुलीचा वारंवार पाठलागून करुन तिला त्रास देऊन पळवून नेले. तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याबद्दल मजनूविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अदित्य प्रकाश आयवळे असे या मजनूचं नाव आहे.
फिर्यादीत पिडितेच्या आईनं म्हटलं आहे की, यातील फिर्यादीची १३ वर्षीय मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही नमूद आरोपीने ३ ऑक्टोबर २०२३ पासून १७ मार्च २०२४ पर्यंत पाठलाग केला. तिला फूस लावून पळवून नेले. १७ मार्च रोजी एका कॉलेसमोरील रोडवर पिडिता व फिर्यादी दुचाकीवरुन जाताना रस्ता अडवून पिडित मुलीशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकाराला कंटाळून पिडितेच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणाची पोलीस निरीक्षक बिराजदार, फौजदार मोरे, हवालदार जाधव यांनी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास फौजदार मोरे यांच्याकडे सोपवला आहे.