शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माहेरवाशीण आशाबाई माढेंनी भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:46 IST

दुष्काळग्रस्त डोंबरजवळगेत मुंबईत वसलेल्या आशाबार्इंनी स्वखर्चातून मारली बोअरवेल 

ठळक मुद्देडोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते.

शंभूलिंग आकतनाळ/ विजय विजापुरे 

चपळगाव /बºहाणपूर : लग्नानंतर सासरी गेलेली स्त्री संसाराच्या जबाबदारीत अडकून पडते. परंतु माहेरी, माहेरच्या गावावर संकट आल्यानंतर निवारणासाठी धावून येणारी माहेरवाशिण क्वचितच पाहायला मिळते. डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) या गावच्या आशाबाई माढे (आता सासरी मुंबईत वसलेल्या) यांनी माहेरच्या गावावर असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चातून चक्क बोअरवेल मारून दिली. विशेष म्हणजे यास तब्बल तीन इंच पाणी लागल्याने डोंबरजवळगेच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आधार मिळाला आहे.

डोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्या दोन-तीन महिन्यांत आपल्या माहेरी डोंबरजवळगेला येत असतात. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते. जनावरांचेही हाल सुरू आहेत. 

शुक्रवारी आशाबाई माढे डोंबरजवळगेला आल्या असता त्यांनी ही परिस्थिती पाहिली. तत्काळ बोअरवेलची गाडी मागविण्यात आली अन् ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराच्या आवारात बोअर मारण्यास प्रारंभ केला. याला यश आले. १०० फुटांपासून ३६० फुटांपर्यंत जवळपास तीन इंच पाणी लागले. पाणीटंचाईत होरपळणाºया गावक ºयांच्या चेहºयावरही पाणी आले. 

एका माहेरवाशिणीने अख्ख्या गावाची तहान भागविण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कार्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दयानंद पवार, निलप्पा पाटील, हिरामणी नारायणकर, मल्लिनाथ चौधरी, अंबणप्पा दुलंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डोंबरजवळगे या माझ्या माहेरगावाला अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. मी माहेरी येते त्यावेळी पाणीटंचाईचे रूप उग्र होताना पाहिले. आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून शुक्रवारी बोअर मारले. ग्रामदैवत महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मुबलक पाणीही लागले. ग्रामस्थांचा वनवास मिटावा हीच भावना आहे.     - आशाबाई माढे

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईWaterपाणी