तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 23:53 IST2025-08-14T23:52:05+5:302025-08-14T23:53:05+5:30
Tirupati Padmavathi News: तिरुपतीमध्ये होणाऱ्या ब्रह्मोत्सवदरम्यान पद्मावती मंदिराकडून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना साडी अर्पण करण्याचा मान मिळाला आहे.

तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान
Tirupati Padmavathi Temple: पद्मशाली समाजाची कुलकन्या पद्मावती देवीला 'पुट्टींटी पट्टचिरा' (माहेरची साडी) अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधव २१ नोव्हेंबर रोजी तिरुपतीला जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये तिरुपतीमध्ये होणाऱ्या ब्रह्मोत्सवदरम्यान पद्मावती मंदिराकडून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना साडी अर्पण करण्याचा मान मिळाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामूहिक देणगीतून यंदा ५१ हजार रुपयांची साडी यंदा आणली जाणार असून तिरुपतीला रवाना होण्यापूर्वी दाजी पेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी कुंकूमार्चना कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी तसेच अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाजबांधवांनी अंबादास बिंगी, नागेश सरगम, स्वाती चिटकेन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी पुण्य श्रीवारी सेवा संस्थेच्या स्वाती चिटकेन यांच्याकडून नियोजन सुरू आहे.
ब्रह्मोत्सवात साडी अर्पण
तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून, या उत्सवात शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत. मागील १६ वर्षांपासून साडी अर्पण करण्याचा मान मिळत आहे.