महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती

By राकेश कदम | Updated: December 10, 2023 18:47 IST2023-12-10T18:45:51+5:302023-12-10T18:47:43+5:30

साेलापुरातील बैठकीनंतर हा याेग जुळून आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी सांगितले.

Mahavikas Aghadi will form a coordinating committee in each district, informed by Sanjay Raut | महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती

महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती

साेलापूर : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅग्रेस या तीन पक्षांची जिल्हास्तरावर एक समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती लाेकसभा निवडणुकीसाठी काम करेल. साेलापुरातील बैठकीनंतर हा याेग जुळून आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी सांगितले.

खासदार संजय राउत रविवारी साेलापूरा दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रवक्ते अशोक निंबर्गी, शिवसेनेचे पुरुषाेत्तम बरडे, अमर पाटील, राष्ट्रवादीचे महेश काेठे, यु.एन. बेरिया, मनाेहर सपाटे आदी उपस्थित हाेते.

राउत यांनी तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. साेलापूरचे लाेक लाेकसभा निवडणुकीत भावनिक हाेउन मतदान करतात. हे तुम्हाला बदलावे लागेल. साेलापूरचा विकास करायचा असेल तर चांगले लाेक निवडून दिले पाहिजेत. भाजप ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झाली आहे. हे केवळ इव्हेंट करतात. गुजरातच्या कंत्रादारांना कंत्राटे देतात. तुम्हाला लाेकशाही टिकविण्यासाठी काम करावे लागेल, असेही राउत यांनी सांगितले.
 

Web Title: Mahavikas Aghadi will form a coordinating committee in each district, informed by Sanjay Raut