Maharashtra's flagship 'Blue Mormon' butterfly was seen in Solapur | महाराष्ट्राचे मानचिन्ह ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू दिसले सोलापुरात

महाराष्ट्राचे मानचिन्ह ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू दिसले सोलापुरात

ठळक मुद्देब्ल्यू मॉरमॉनचा आकार साधारणपणे १२ ते १५ सेंटिमीटर एवढा असतोचार आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी लव ही त्याची आणखी काही वैशिष्ट्ये आहेतपश्चिम घाटात आढळणाºया ‘ब्ल्यू मॉरमॉन’ चे ‘पपिलियो पालिमनेस्टर’ हे शास्त्रीय नाव आहे

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेले ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू सध्या सोलापुरात दिसत आहे. शहर व परिसरात ‘ब्ल्यू मॉरमॉन’चे प्रजनन झाल्याच्या नोंदी आतापर्यंत झालेल्या नाहीत. हे फुलपाखरु पश्चिमघाटाकडून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करुन सोलापूर शहर व परिसरात येतात.

साधारणपणे शहर व परिसरात पावसाळा ते हिवाळ्याच्या दरम्यान ही फुलपाखरं दिसून येतात. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे फुलपाखरू साधारणपणे बारा सेंटिमीटरचे असते. ते उडत असताना एखादा लहान पक्षी उडत असल्याचा भास होतो. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे भारतातील दोन नंबरचे सर्वात मोठे फुलपाखरू आहे. सम्राट चौक परिसरातील प्रभाकर महाराज रोड, भगवती महावीर हौसिंग सोसायटी येथे नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत छेडा यांना ‘ब्ल्यू मॉरमॉन’ दिसले. 

फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे. आत्तापर्यंत राज्यात सुमारे २२५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर ब्ल्यू मॉरमॉन हे     सर्वात मोठे फुलपाखरू आहे. हे फुलपाखरु मखमली काळ्या रंगाचे असून त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील केवळ महाराष्ट्र (पश्चिम घाट), दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. २०१५ मध्ये या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला होता.

ब्ल्यू मॉरमॉनचा आकार साधारणपणे १२ ते १५ सेंटिमीटर एवढा असतो. काळे निळसर पंख, त्यावर चमकदार निळसर ठिपके असलेल्या या फुलपाखराचे शरीर तीन भागात विभागलेले असते. चार आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी लव ही त्याची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळणाºया ‘ब्ल्यू मॉरमॉन’ चे ‘पपिलियो पालिमनेस्टर’ हे शास्त्रीय नाव आहे. राज्यातील एकूण फुलपाखरांमध्ये ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची संख्या १५ टक्के नोंदवली गेलेली आहे. लिंबू, संत्रे, बेल या त्याच्या आवडत्या वनस्पती आहेत. बºयाचदा पावसाळ्यात ही फुलपाखरे बागांमध्ये, माळरानांवर दिसून येतात. फुलपाखरांचे कोशातून बाहेर येणे हा कसोटीचा क्षण असतो. कारण ती भल्या पहाटे कोशातून बाहेर येताना त्यांचे पंख ओलावलेले असतात. त्यांना भक्षकांनी गाठू नये म्हणूनच ही निसर्गाने योजना केली असावी.

Web Title: Maharashtra's flagship 'Blue Mormon' butterfly was seen in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.