शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:42 IST

Flood Situation of Bhima River Today: उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

- अप्पासाहेब पाटील, सोलापूरटेंभुर्णी (सोलापूर) : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून ७० हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने आषाढी वारीचा पार्श्वभूमीवर उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. शुक्रवारी (२० जून ) दुपारी ३ वाजता १ हजार ६०० कुसेक तर सायंकाळी ५ वाजता १० हजार क्यूसेक असा ११ हजार ६०० क्यूसेक सोडण्यात येणार आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सध्या उजनी धरणाची पाणी पातळी सकाळी ९ वाजता ६३ टक्के पर्यंत पोहचली होती. त्यात सातत्याने वाढ होत आहे. उजनी धरणाची क्षमता पाहता आषाढी वारीचा पर्शवाभूमीवर महत्ववाचा निर्णय मानला जात आहे.

वाचा >>कुठे कमरेपर्यंत पाणी तर, कुठे दरड कोसळली; मान्सूनने महाराष्ट्र व्यापला!

पावसाळा आणखी चार महिने शिल्लक असल्याने पंढरपूर येथे पुढील काळात पुरस्थिती कायम राहणार आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली असली तरी बंडगार्डन येथील विसर्ग सकाळी घटला आहे. 

कोणत्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू?

बंडगार्डन येथून सकाळी ९ वाजता २४ हजार कुसेक होता. रात्री ३८ हजार कुसेक पर्यंत गेला होता. सकाळी त्यात घट झाली आहे. तर खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कायम असून १५ हजार ९२ क्यूसेक्स विसर्ग मुळा मुठा नदी पत्रात सोडण्यात येत आहे. 

घोड धरणातून ४ हजाराचा विसर्ग कायम आहे. सध्या उजनी धरणात एकूण ९७ टीएमसी पाणीसाठा झाला असून ३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ७५ टक्के पर्यंत पाणी पातळी स्थिर ठेवण्याचे नियोजन उजनी धरण व्यवस्थापन करत आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरfloodपूरriverनदीUjine Damउजनी धरणRainपाऊस