Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
By संतोष कनमुसे | Updated: December 21, 2025 12:41 IST2025-12-21T11:58:48+5:302025-12-21T12:41:36+5:30
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : सांगोला नगरपंचायतचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शेकाप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती.

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : सांगोला नगर पंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शेकाप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रित निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक लढवली, या निवडणुकीची राज्यात चर्चा झाली होती. दरम्यान, आता निकाल समोर आले आहेत. शहाजीबापू पाटील यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
शिवसेनेचे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनीही विजय मिळवला आहे. सांगोल्यात भाजपा, शेकाप आणि माजील आमदार दीपक साळुंखे यांनी युती केली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडणूक लढवली. ही निवडणूक चुरशीची झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सांगोल्यात झाल्या.
या निवडणुकीत सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील एकटे पडल्याचे पाहायला मिळाले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप पक्षाबरोबर युती करत निवडणूक लढवली. अनेकवेळा शहाजीबापू पाटील यांनी एकट पाडल्याचे बोलून दाखवले होते.
दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचारसभा झाल्या होत्या. आरोप-प्रत्यारोप झाले होते. दरम्यान, विकास कामांवरुन आरोप झाले होते. सुरुवातील भाजपा आणि शेकापची बाजू मजबूत दिसत होती. पण, प्रचारात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आघाडी घेतली होती. निवडणूक काळात पाटील यांच्या कार्यालयावर आयोगाचे छापेही पडले होते. दरम्यान, आता मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे.