महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस
By Appasaheb.patil | Updated: December 7, 2022 15:06 IST2022-12-07T15:05:10+5:302022-12-07T15:06:04+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक वाद चांगलाच पेटला असून याचे पडसाद आता सोलापूर शहरातही दिसू लागले आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस
सोलापूर : येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सात रस्ता येथे कर्नाटकची बस अडवून कर्नाटक सरकार विरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक वाद चांगलाच पेटला असून याचे पडसाद आता सोलापूर शहरातही दिसू लागले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. याचे प्रसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सात रस्ता येथे बुधवारी दुपारी विजापूर कडे निघालेली बस अडवून निषेधाच्या घोषणा दिल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री दिवसेंदिवस महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वाद वाढतच चालला आहे. एसटी बसेसची तोडफोड, सीमावर्ती भागात आंदोलन, रास्ता रोको अशा विविध घटना दररोज घडत आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावे कर्नाटक राज्यात जाण्यास इच्छुक असल्याचेही सांगण्यात आले आहे. याबाबत पोलिस व जिल्हा प्रशासन विविध विषयावर चर्चा करीत असल्याचे सांगितले.