शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 18:04 IST

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली.

सोलापूर : काँग्रेसने जीवनात कधीच असा घमंड केला नाही. अजित पवारांना काय बोलायचं आहे, हे त्यांचे मत आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया देणे काही गरजेचे नसल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मोठा भाऊ असेल, या अजित पवाराच्या विधानावर बोलताना पटोले यांनी अजित पवारांना काय बोलायचं आहे, हे त्यांचे मत आहे. आमची मागच्या काळात मिटींग झाली आहे. मेरीटच्या आधारावर प्रत्येक ठिकाणी निर्णय होतील, असे सांगितले. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. 

दरम्यान, बीजेपी वाल्यांना माझा सवाल आहे. केरळ मधली गाय तुमची काय लागते. गोव्यामधील गाय तुमची काय लागते. नॉर्थ ईस्ट मध्ये तुमची गाय काय लागते. हे फक्त महाराष्ट्रातील जनतेला भाजपने प्रामाणिकपणे सांगावे, असा प्रश्न पटोले यांनी आशिष शेलार यांना केला. तसेच गाय तिथे खाणारी वस्तू आहे, तर इथे आई आहे. या पद्धतीचा धार्मिक तेढ निर्माण करून, वाद करून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. त्यामुळे तुमचा खरा चेहरा जनतेने ओळखला आहे. भाजपवाल्यांची गाय कधीच आई झाली नाही. गाईच्या नावाने भाजप राजकारण करते. गंगेच्या पाण्यासंदर्भात ही राजकारण करतात. त्यामुळे हिंदुत्वाचा जो बुरखा होता तो भाजपचा फाटला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात हनुमानजी काँग्रेससोबत आले, रामजी काँग्रेससोबत आले आहेत. भाजपसाठी आता हिंदुत्व काही राहिली नाही, अशी टीका त्यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल बोलताना पटोले यांनी म्हटले, "नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात स्वागत आहे. मोदी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा आहे. 2014 पासून त्यांनी जे आश्वासन दिले आहे, त्यासंदर्भात आता ते भाषण युट्युबवर व्हायरल  होत आहे. दोनशे कोटी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल बांधण्याचे सांगितले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की नाही १४० कोटी जनता भारतीय आहे. मात्र घोषणा करूनही अजूनही असंख्य नागरिकांना घरं मिळाली नाही. महाराष्ट्रात मोदीजी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे."

तसेच काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला असून  काँग्रेस पक्षच हा देशाला आणि राज्याला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. देश विकून देश चालवणाऱ्या भाजपला नागरिकांनी ओळखले आहे. संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते. राज्यात सध्या दररोज साठ ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचे दिसत आहे, पोलीस यंत्रणेवर दबाव आहे. राहुल गांधी यांनी नारा दिला आहे 'डरो मत' तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहे. महाराष्ट्र हा समता आणि बंधुत्वाचा, शाहू फुले यांचा महाराष्ट्र आहे. राज्यातील पोलीस कोणाच्या दबावात आहेत हा आमचा प्रश्न आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे, अकोला, छत्रपती  संभाजीनगर, नगर या ठिकाणी पोलीस दबावात होते. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारू. कोण आहे हा सूत्रधार जो महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडवत आहे आज ना उद्या तो नागरिकांसमोर येईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.   

 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी