शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आमदारकीचा षटकार.. ‘बबनदादां’च्या नेतृत्वाला पुनश्च धार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:31 PM

Madha Vidhan Sabha Election Results 2019: माढ्याचं रणांगण : संजय कोकाटेंचे एकाकी लढतीचे आव्हान व्यर्थ; मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या १४ गावांतूनही मताधिक्य

ठळक मुद्देआमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्वप्रत्येकवेळी त्यांच्या मताधिक्याचा आलेख हा चढताच राहिलाशिवसेनेचे संजय कोकाटे यांनी एकाकी लढत देऊन निर्माण केलेले आव्हान कामी आले नाही

डी.एस. गायकवाड 

माढा : गेल्या २५ वर्षांपासून मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांवर शिक्कामोर्तब करून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांना सहाव्यांदा विक्रमी मतांनी विजयी केले आहे तर शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी एकाकी लढत देऊन निर्माण केलेले आव्हान कामी आले नाही.

आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तेव्हापासून ते सतत सहाव्यांदा विजयी झाले आहेत. प्रत्येकवेळी त्यांच्या मताधिक्याचा आलेख हा चढताच राहिला आहे. यावेळी एकास-एक लढत होऊनही त्यांनी आतापर्यंतचे आपलेच रेकॉर्ड मोडीत काढून तब्बल ६७ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. हा एक विक्रम आहे.मागील २५ वर्षांत सत्तेच्या माध्यमातून केलेली विकासकामे, ५ पंचवार्षिक निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव, निवडणूक लढविण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची साधनसामुग्री, प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आवश्यक असणारे उपलब्ध मनुष्यबळ या सर्व बाबी आमदार बबनराव शिंदे यांच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

सर्वात महत्त्वाचे आमदार शिंदे यांचा साखर कारखानदारी व मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून सामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क व त्यांच्याबद्दल असलेला विश्वास, गावोगावी असलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांचे जाळे,  या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणूनच आमदार शिंदे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत .

माढा मतदारसंघातील सर्वच गावातील लोकांशी त्यांचा थेट संपर्क असल्यानेच त्यांना माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या १४ गावांमधूनही अकराशे मतांचा लीड मिळाला आहे. मोहिते-पाटील मात्र हजारांचे मताधिक्य संजय कोकाटे यांना देण्याचे जाहीर सभांमधून सांगितले होते, परंतु लीड तर सोडाच उलट शिंदे यांनाच मताधिक्य मिळाले आहे हे अनाकलनीय आहे .आमदार बबनराव शिंदे यांना माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सर्वच गावातून मताधिक्य मिळाले आहे. स्वत: आमदार बबनराव शिंदे यांनीही आपण ३० ते ३५ हजार मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होऊ असे म्हटले होते, परंतु प्रत्यक्ष मात्र त्यांच्या अपेक्षेपेक्षा डबल मताधिक्य मिळाले आहे. या सर्व घडामोडीत कोणता फॅक्टर प्रभावी ठरला याची चर्चा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसह संजय कोकाटे यांचेही कार्यकर्ते करीत आहेत .

 मत विभागणी टाळण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यात आमदार शिंदे यांचे सर्वच विरोधक यशस्वी ठरले. यावेळी मोहिते-पाटील, परिचारक, काळे, सावंत या ज्येष्ठांसह तालुक्यातील शिवाजी कांबळे, प्रा. शिवाजी सावंत,भारत पाटील, प्रा. सुहास पाटील यांच्यासह अनेक शिंदे विरोधक हे निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात एकत्र होते. माजी आमदार धनाजी साठे व संजय पाटील-भीमानगरकर यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली होती, परंतु जसजशी निवडणूक पुढे सरकत गेली तसतसे मोहिते-पाटील माळशिरस मतदारसंघात, परिचारक गट पंढरपूर मतदारसंघात, सावंत कुटुंबीय परांडा-भूम मतदारसंघात अडकून पडले,काळे गट प्रचारात फारसा सक्रिय झालेला दिसला नाही.

ज्या मातब्बर नेत्यांच्या विश्वासावर शिवसेनेचे संजय कोकाटे निवडणूक लढवत होते त्या सर्वांनीच झोकून प्रचार केला नाही किंवा त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे संजय कोकाटे एकाकी पडले. केवळ शिवाजी कांबळे, प्रा.सुहास पाटील, पृथ्वीराज सावंत यांना घेऊनच प्रचारात सामोरे जावे लागले.

अपुरी यंत्रणा अन् हेवेदावे कोकाटेंना नडले- संजय कोकाटे यांची नवखी उमेदवारी, हाताशी असलेली तोकडी प्रचार यंत्रणा, कोणत्याही मोठ्या नेत्यांचा प्रचारात नसलेला सहभाग, एकमेकांतील हेवेदावे, प्रचारात नसलेली सुसूत्रता अपुरा मॅनपॉवर यामुळे संजय कोकाटे यांना एकला चलो रे भूमिकेतूनच एका मातब्बर उमेदवारांशी एकाकी झुंज द्यावी लागली. त्यामुळे परिवर्तनाची सुप्त लाट असूनही त्याचा फायदा कोकाटे यांना झाला नाही. जनतेने पुन्हा एकदा आमदार शिंदे यांच्याकडेच सहाव्यांदा सत्ता सोपवली आहे.

माळशिरसची मते मायनस - माळशिरस तालुक्यातील १४ गावामधून १७ हजारांचे लीड तर सोडाच उलट अकराशे मते मायनस झाली आहेत हाच या मतदारसंघातील कळीचा मुद्दा ठरला आहे. येथे नेमके काय झाले असा प्रश्न लोकांना पडला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmadha-acमाढाBabanrao Shindeबबनराव शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस