सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे; मुस्लिम बांधवांनी विक्रेत्याला पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले
By Appasaheb.patil | Updated: June 29, 2023 13:40 IST2023-06-29T13:39:28+5:302023-06-29T13:40:18+5:30
बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी घडला प्रकार.

सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे; मुस्लिम बांधवांनी विक्रेत्याला पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले
सोलापूर : सोलापुरातील ईदगाह मैदानावर लव पाकिस्तान असं लिहिलेला आणि पाकिस्तानचे चिन्ह असलेला फुगे विक्री करणाऱ्याला तेथिलच नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान आज बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले होते. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी सुख शांती समृद्धी हो भरपूर पाऊस पडू दे यासाठी अल्लाहाकडे प्रार्थना केली. नमाज पठण झाल्यानंतर बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी मैदानाच्या एका बाजूला आय लव पाकिस्तान व पाकिस्तानचे चिन्ह असलेल्या फुगे विकताना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अधिकचा तपास करीत असल्याची माहिती मिळाली.