शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

लव्ह जिहाद: भाजप नेत्यांच्या घरात अशीच लग्न झाली, त्याचे काय : रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 09:20 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादच्या कायद्यावर गुरुवारी आपले मत व्यक्त केले. मला खोलात जायचं नाही. कुणाच्या कुटूंबाबद्दलही बोलायचे नाही. पण भाजपच्या काही मोठ्या नेत्यांच्या घरात अशी लग्न झालेली आहेत. तिथं आपण याच पध्दतीनं म्हणायचा का?, असा सवाल त्यांनी केला. 

येथील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात एक वर्षांनी निवडणुका आहेत. त्यामुळे असे विषय समोर येत आहेत. मूळात असे विषय हे व्यक्तीगत असतात. आज संविधान दिन आहे. संविधानाने दिलेला हक्क आहे. तिथे एसआयटी लावली होती. या कामासांठी पैसा लावला जातोय का? याची चौकशी झाली. पण यासाठी कुठल्याहा प्रकार नसल्याचे एसआयटीने दाखवून दिले आहे. 

भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात असा कायदा करु  म्हटले आहे. यावरही रोहित पवारांनी भाष्य केले. राम कदम यांना सांगा की बेरोजगारी मोठी आहे. मुलांच्या पोटाचं बघुया. मुलांच्या हातानं काम मिळवून देऊया. युवकांना दिशा देऊया. उगाचच तुम्ही दुसऱ्या मुद्याच्या दिशेने गेलात तर पिढी बरबाद होईल. लोकांची स्वप्न बरबाद होतील. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, मनोहर सपाटे, अजिंक्यराणा पाटील, सुभाष गुळवे आदी उपस्थित होते. 

पार्थ पवारांसोबतच माझं नातं महत्त्वाचं 

पार्थ पवारांना डावलून रोहित पवारांना बळ दिल्याची खंत अजित पवारांना असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. याबद्दल रोहित पवार म्हणाले, पुस्तक कुठलही असलं तरी ते लिहिणाऱ्याच्या डोक्यानं लिहिलं जातं. माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे. हे नातं त्या लिहिणाऱ्यापेक्षा मोठं आहे. ----विमानसेवेवरही भाष्य

विमानसेवा नसल्याने सोलापुरात उद्योग येत नाहीत या मताशी मी सहमत नाही. परंतु, सोलापुरातील विमानतळासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मी सुध्दा यासाठी प्रयत्न करेन.

टॅग्स :SolapurसोलापूरRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसLove Jihadलव्ह जिहादRam Kadamराम कदम