शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

‘लोकमत’ बांधावर; झाडे करपली, टोमॅटो नासले; उरले केवळ बांबू अन् दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:56 IST

मोडनिंब परिसरातील स्थिती : कांद्याच्या पाती जळून वाढ खुंटली, शेतकरी संकटात

ठळक मुद्देखराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग  पडलाशेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके  जागीच जळून जात आहेतमोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला

मारुती वाघ

मोडनिंब : सध्या सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. मोडनिंब (ता़ माढा) परिसरातील पोपट पावणे या शेतकºयाच्या शेतात जाऊन पाहणी केली असता टोमॅटोच्या फडातील सर्व झाडे करपली होती, टोमॅटो नासले होते, परिणामी केवळ उभे बांबू आणि दोरीच दिसून आली.मोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला असला तरी या पावसाने शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले़ विशेषत: कांदा, टोमॅटो, ज्वारी, सिमला मिरची याचे नुकसान झाले आहे.

सध्या पाऊस थांबला असला तरी रोजच धुके पडत आहे़ खराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग  पडला आहे़ शेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके  जागीच जळून जात आहेत़    झाडांना फांद्याशिवाय एक पान राहिलेले दिसत नाही़ कांदा पिकाच्या पाती पूर्णपणे जळून गेल्यामुळे त्याची वाढ थांबलेली आहे, असे माऊली हागे या शेतकºयाने सांगितले.

अरण शिवारातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या पिकाची पाहणी केली असता दिलीप सोलंकर, विष्णू सोलंकर, शिवाजी इंगळे, नवनाथ इंगळे, राजू इंगळे हे शेतकरी म्हणाले, आम्ही अतिशय कष्टाने लावलेला व जोमदार आलेला कांदा केवळ खराब हवामान, धोक्यामुळे व रिमझिम पावसामुळे जागेवरच पिवळा झाला आहे़ परिणामी आता त्याची वाढ थांबली़ यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

द्राक्ष बागायतदार बबन वाघमारे म्हणाले, सध्या ढगाळ वातावरण आणि धुके पडून रोगराई पसरत आहे; मात्र बागेमध्ये   सगळीकडे पाणीच असल्याने फवारणी करता येत नाही़ त्यामुळे नुकसान होत आहे.

तरी प्रशासनाने मोडनिंब,अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, सोलंकरवाडी, बावी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पावसानं बुडाले अडीच लाख- मोडनिंब येथील शेतकरी पोपट पावणे म्हणाले, जमिनीची मशागत, शेणखत लागवड, खते, फवारणी, बांबू व तारा मजुरी यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाला़ आतापर्यंत ३ लाख रुपये उत्पादन मिळाले आहे़ अजून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन अपेक्षित होते; मात्र रिमझिम पाऊस व हवामान बदलामुळे धुके पडून टोमॅटोचे नुकसान झाले़ तसेच त्यांच्या शेजारील माऊली हागे, विजय वाघ याही शेतकºयांची करपा रोगाने पूर्णपणे झाडे जळून नुकसान झाले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी