Lokmangal, Adinath, Gokul, Jayhind, Fabtech sugar factories will remain closed this year | लोकमंगल, अदिनाथ, गोकुळ, जयहिंद, फॅबटेक साखर कारखाने यंदा राहणार बंदच

लोकमंगल, अदिनाथ, गोकुळ, जयहिंद, फॅबटेक साखर कारखाने यंदा राहणार बंदच

ठळक मुद्देयंदाच्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना मागणी करणाºया साखर कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील २७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ अशा ३८ कारखान्यांचा समावेश नितळी येथील जयलक्ष्मी या अवसायनात काढलेला करखानाही गाळप सुरू करण्याच्या तयारीत आहे

सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत; मात्र सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यांचे प्रस्ताव मुदतीत दिलेले नाहीत.

सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडे ३० सप्टेंबरअखेर यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास इच्छुक असलेल्या साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी विहित नमुन्यात आॅनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित होते , अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली.

ऊस उत्पादक शेतकºयांच्या ऊस बिलाची (एफआरपी) रक्कम काही कारखान्यांनी अद्यापपर्यंत अदा केली नाही तरीही त्यांना गाळप परवाना मागणीचा अर्ज करता येतो; मात्र कारखान्याने गतवर्षीच्या हंगामातील संपूर्ण देणी देऊन बेबाक दाखले   सादर केल्याशिवाय त्यांना परवाना मिळणार नाही. यातील काही कारखान्यांचा अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली असली तरी परवाना मागणी न करण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे.

अर्ज न करणारे कारखाने

  • गोकुळ शुगर    :    धोत्री
  • लोकमंगल    :    भंडारकवठे
  • लोकमंगल    :      बीबीदारफळ
  • जयहिंद शुगर    :    आचेगाव
  • फॅबटेक    :    न्    नंदूर
  • आदिनाथ    :    करमाळा
  • मातोश्री लक्ष्मी शुगर    :    रुद्देवाडी

सोलापूर जिल्ह्यात २७ तर उस्मानाबादच्या ११ कारखान्यांचा समावेश
यंदाच्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना मागणी करणाºया साखर कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील २७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ अशा ३८ कारखान्यांचा समावेश आहे. नितळी येथील जयलक्ष्मी या अवसायनात काढलेला करखानाही गाळप सुरू करण्याच्या तयारीत आहे.

 

Web Title: Lokmangal, Adinath, Gokul, Jayhind, Fabtech sugar factories will remain closed this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.