शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

Lok Sabha Election 2019; रणजितदादांनी गाठला दीपकआबांच्या साक्षीनं भाजप मंत्र्यांचा बंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:12 PM

सोलापूर : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील  यांना सांगितले की, ‘मी उभारणार नाही. तुमच्यासाठी  माढा सोडतोय.’ ...

ठळक मुद्देपवार म्हणाले, ‘मोहिते-पाटलांसाठी माढा सोडतोय’सोलापूर-सातारा जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांचा नव्या नावाला विरोधऐन निवडणुकीच्या तोंडावरच दादांना भाजपाचे महाजन का आठवले ?

सोलापूर : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील  यांना सांगितले की, ‘मी उभारणार नाही. तुमच्यासाठी  माढा सोडतोय.’ तेव्हा विजयदादा म्हणाले, ‘मला नको, रणजितदादांना उमेदवारी द्या.’ त्यानंतर रामराजे, बबनदादा, रश्मीदीदी अन् जयकुमार यांनी नव्या नावाला कडाडून विरोध केल्यामुळे उमेदवारीची घोषणा लटकली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रणजितदादांनी थेट मुंबई गाठली अन् जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. 

दरम्यान, मोहिते-पाटील घराण्यातील उमेदवारीचा निर्णय न होणे अन्  प्रभाकर देशमुख यांचे नाव पुन्हा चर्चेत येणे अन् त्याचवेळी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी भाजपामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर खासगी भेट घेणे, यातून अवघ्या महाराष्ट्राला मंगळवारी नवी ब्रेकिंग न्यूज मिळाली; मात्र ‘सोमवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयातूनच मी जलसंपदा मंत्री महाजन यांना मोबाईल कॉल केला होता. आमच्या शंकर साखर कारखान्याच्या पाणीपट्टीसंदर्भात मी त्यांना मंगळवारी भेटायला येणार असे सांगितले होते. विशेष म्हणजे मोबाईलवर बोलत असताना माझ्यासमोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांच्यासह इतरही नेते होते,’ अशी माहिती रणजितदादांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याने आसवानी प्रकल्प सुरू केला आहे. या कारखान्याकडे मोठी पाणीपट्टी थकीत आहे. तीन महिन्यांपूर्वी या कारखान्याचे चेअरमन म्हणून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची निवड झाली आहे. या थकीत पाणीपट्टीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रणजितदादा सांगत आहेत. पवारांच्या माघारीनंतर माढ्यातील उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. पुण्यात सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. पण सायंकाळी पुन्हा प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत आले. 

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील काही नेत्यांनी रणजिदादांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

 या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघात एंट्री झाली होती. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच दादांना भाजपाचे महाजन का आठवले ?- विरोधी पक्षातील एखादा नेता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटला तर तो भाजपच्या वाटेवर असल्याचे अधिकृत संकेत स्पष्टपणे मिळतात. नगरचे सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा  महाजन यांच्यासोबतच झाली होती. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी महाजनांच्या बंगल्यावर सुजय यांच्या भाजपा प्रवेशाची तयारी सुरू असताना त्याचवेळी रणजितदादा या ठिकाणी येणे, योगायोगाचे नव्हते, असे कार्यकर्ते सोशल मीडियावर ठामपणे सांगत होते. कारखान्याचा विषय अनेक दिवसांपासूनचा असला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच रणजितदादांना भाजपाचे महाजन का आठवले ?, असाही प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलSharad Pawarशरद पवार