Lok Sabha Election 2019: आजी-माजी मंत्र्यांचे भवितव्य यंदा सोलापूर जिल्हा ठरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:59 AM2019-03-11T10:59:16+5:302019-03-11T12:00:07+5:30

सोलापुरात १६,९९,८१८ मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

Lok Sabha Election 2019: Solapur District will decide the future of the former minister | Lok Sabha Election 2019: आजी-माजी मंत्र्यांचे भवितव्य यंदा सोलापूर जिल्हा ठरविणार

Lok Sabha Election 2019: आजी-माजी मंत्र्यांचे भवितव्य यंदा सोलापूर जिल्हा ठरविणार

Next
ठळक मुद्देगेल्या १५ वर्षांत आलटून-पालटून कौल देणाºया सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक गाजणारयंदा सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून, भाजपचा उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेला नाही.

राकेश कदम 

सोलापूर : गेल्या १५ वर्षांत आलटून-पालटून कौल देणाºया सोलापूरलोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक गाजणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून भाजपचे खासदार शरद बनसोडे निवडून आले. यंदा सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून, भाजपचा उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. या मतदारसंघात १६,९९,८१८ मतदार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला देणार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील मोहोळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पंढरपूर, शहर मध्य, अक्कलकोट हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. शहर उत्तर आणि शहर दक्षिण मतदारसंघ भाजपकडे आहेत. सोलापूर शहर हे बहुभाषिक लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. गेल्या १५ वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोनवेळा भाजपकडे तर दोनवेळा काँग्रेसकडे राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारसंघाची संख्या वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या मतदारसंघातील लढत रंगणार आहे. 

 जयसिद्धेश्वर महास्वामी की अमर साबळे
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध भाजपकडून खासदार अमर साबळे यांचे नाव चर्चेत आहे. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचेही नाव चर्चेत आले असून, त्यांनी वेगवेगळ्या मठांमध्ये बैठका सुरू केल्या आहेत. भाजप नेते कोणाला पसंती देतात, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

कोणत्या पक्षाचे किती आमदार
शहर मध्य, अक्कलकोट, पंढरपूर     :     काँग्रेस
शहर उत्तर, सोलापूर शहर दक्षिण     :     भाजप
मोहोळ                                            :     राष्ट्रवादी काँग्रेस

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आजवरचे खासदार

  • वर्ष        खासदार            पक्ष
  • १९५२        शंकरराव मोरे        शेकाप
  • १९५७        बाळासाहेब मोरे    संयुक्त महाराष्ट्र समिती
  • १९६२        एम. बी. काडादी        काँग्रेस
  • १९६७        सूरजरतन दमाणी        काँग्रेस
  • १९७१        सूरजरतन दमाणी        काँग्रेस
  • १९७७        सूरजरतन दमाणी        काँग्रेस
  • १९८०        गंगाधर कुचन        काँग्रेस
  • १९८४        गंगाधर कुचन        काँग्रेस
  • १९८९        धर्मण्णा सादूल        काँग्रेस
  • १९९१        धर्मण्णा सादूल        काँग्रेस
  • १९९६        लिंगराज वल्याळ        भाजप
  • १९९८        सुशीलकुमार शिंदे        काँग्रेस
  • १९९९        सुशीलकुमार शिंदे        काँग्रेस
  • २००३        (पोटनिवडणूक)    प्रतापसिंह मोहिते-पाटील    भाजप
  • २००४        सुभाष देशमुख        भाजप
  • २००९        सुशीलकुमार शिंदे        काँग्रेस

सोलापूर लोकसभा मतदार
एकूण मतदार : १६९९८१८, पुरुष मतदार : ८९२१८५, स्त्री मतदार : ८,०७,६३३

Web Title: Lok Sabha Election 2019: Solapur District will decide the future of the former minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.