शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; माढ्यामध्ये देशमुख विरुद्ध मोहिते-पाटील लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:58 IST

नावे निश्चित, पण पक्षांनी ठेवला निर्णय राखून; विजयदादा की रणजितसिंह, हीच उत्सुकता

ठळक मुद्देपवारांच्या माघारीनंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यतामाढ्यात पवारांच्या विरोधात भाजपाकडे स्थानिक तगडा उमेदवार नसल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी देण्याचा घाट

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले असले तरी शरद पवार यांच्या भूमिकेवर पुढील निर्णय राखून ठेवला आहे. पवारांच्या माघारीनंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती; मात्र मंगळवारी अकस्मातपणे पुन्हा एकदा माणदेशातील प्रभाकर देशमुख यांच्या नावाची राष्ट्रवादी पक्षात चर्चा सुरू झाल्याने मोहिते-पाटील घराण्याच्या भूमिकेकडे साºयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

माढ्यात पवारांच्या विरोधात भाजपाकडे स्थानिक तगडा उमेदवार नसल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी देण्याचा घाट घातला गेला होता; मात्र पवारांच्या माघारीनंतर भाजपाचाही उमेदवार बदलला जाणार का? याची चर्चा सुरू झाली होती. माढ्यात राष्टÑवादीचा उमेदवार कुणीही असो, भाजपाकडून सुभाष देशमुखच उभारणार अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, देशमुखांची कार्यकर्ते मंडळीही सोलापुरातून माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराला लागली आहेत. 

  मंगळवारी अचानक प्रभाकर देशमुखांचे नाव चर्चेत आले.  रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्यामुळे नव्या चर्चेला ऊत आला. प्रभाकर देशमुखांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली गेली तर मोहिते-पाटील भाजपामध्ये जाणार, अशाही बातम्या सोशल मीडियावर झळकल्या. राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील उभारले तर भाजपाकडून सुभाष देशमुख निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळाली तर कदाचित भाजपाकडून मोहिते-पाटील यांना उभे केले जाईल, अशीही शक्यता रणजितसिंहांच्या महाजन भेटीमुळे व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ माढ्यात देशमुख विरुद्ध मोहिते-पाटील अशीच लढत होईल. 

पवारांनी पुनर्विचार करावामाढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी माढा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत निवडणूक लढविण्याबाबत पवारांना विनंती करण्यात आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPoliticsराजकारण