शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

रात्रभर पायी प्रवास; सोलापूर बनले स्थलांतरित मजुरांचे जंक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 3:23 PM

सात राज्यांकडे जाण्याचा मार्ग;  हजारो परप्रांतीयांचा निश्चय ‘डू आॅर डाय’

ठळक मुद्देएवढेच नव्हे तर ज्या मजुरांची प्रवासाची कुठलीही सोय नाही, असे मजूर चक्क पायी जात आहेतहजारो कि.मी. कुटुंबकबिल्यासह पायी जाणाºया मजुरांच्या राहुट्या सोलापूरच्या महामार्गावर दिसत आहेत दिवसभर रस्त्याच्या कडेला सावली बघून आराम आणि रात्रभर पायी प्रवास असा सध्या या मजुरांचा दिनक्रम

महेश कुलकर्णी 

सोलापूर : टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कि.मी. अंतरावरून भाकरीच्या शोधात आलेले लाखो परप्रांतीय कामगार आणि मजूर आज ‘कोरोना’च्या जीवघेण्या साथीला घाबरून आपापल्या गावी जाण्यासाठी मिळेल तो मार्ग स्वीकारत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणांहून निघालेले सात राज्यांतील हे मजूर सोलापूरमार्गे पायी आपापल्या राज्याकडे निघालेले आहेत. ‘डू आॅर डाय’ असा पक्का निश्चय करून या परप्रांतीयांचा तांडा हजारो मैल चालत निघाला आहे.

सोलापूर हे तीन राज्यांच्या सीमेवरचे शहर आहे. महाराष्टÑासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राजे सोलापूरमुळे जोडली गेलेली आहेत. सोलापुरातून विजयपूरमार्गे कर्नाटक आणि तामिळनाडूकडे जाता येते. हैदराबादमार्गे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आणि केरळ तर तुळजापूर-औरंगाबादमार्गे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना जोडणारे रस्ते आहेत. 

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या औद्योगिक नगरीत काम करणारे लाखो कामगार आणि मजूर जीवाच्या आकांताने आपल्या गावाकडे जायला निघाले आहेत. या परप्रांतीयांचे जत्थेच्या जत्थे सोलापूरच्या विजयपूर, हैदराबाद आणि तुळजापूर मार्गावर दिसत आहेत. राज्य सरकारने रेल्वे आणि एसटीची सुविधा उपलब्ध केल्याचे सांगूनही अनेक मजुरांनी अवैधरीत्या गाडीची सोय केलेली आहे. लांबचा प्रवास असल्याने आणि दोन-तीन राज्यांच्या सीमा पार करायच्या असल्याने वाहनधारक या मजुुरांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करीत आहेत. एवढे करूनही एका गाडीत क्षमतेपेक्षा जास्त मजुरांना बसविल्यास कोरोना पसरण्याची मोठी भीती असतेच. स्वत:च्या जीवावर उदार होऊन या परप्रांतीय मजुरांनी आपल्या कुटुंबीयांकडे परत जाण्याचे ठरविले आहे.

एवढेच नव्हे तर ज्या मजुरांची प्रवासाची कुठलीही सोय नाही, असे मजूर चक्क पायी जात आहेत. हजारो कि.मी. कुटुंबकबिल्यासह पायी जाणाºया मजुरांच्या राहुट्या सोलापूरच्या महामार्गावर दिसत आहेत. दिवसभर रस्त्याच्या कडेला सावली बघून आराम आणि रात्रभर पायी प्रवास असा सध्या या मजुरांचा दिनक्रम आहे.

फाळणीसारखी स्थिती- १९४७ साली भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर लाखो लोकांचे थवे भारतातील सर्वच प्रमुख मार्गांवरून स्थलांतरित होताना दिसत होते. अशाच प्रकारची स्थिती स्वातंत्र्यानंतर आता पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे. प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने मजूर आपल्या कुटुंबासह रस्त्यावरून जाताना दिसत आहेत.

सात राज्यांचे आठ लाख मजूर- महाराष्टÑात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांतील मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या राज्यांमधील ८ लाखांच्या आसपास मजूर महाराष्टÑातील प्रमुख गावात काम करतात. हे सर्व मजूर सोलापूरमार्गे आपल्या राज्याकडे निघाल्याने सोलापूरच्या प्रमुख मार्गांवर रांगा दिसत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस