शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्यांचा घोळ संपेना; दिवाळीनंतरही खात्यात पैसे जमा होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 16:56 IST

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी मिळाले २७ कोटी ४८ लाखांचा निधी

लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी

माढा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं व त्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या पुरामुळे ११७ गावातील ४३ हजार ९१३ हेक्टर शेतीचे क्षेत्र बाधीत झाले होते. त्याचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई म्हणून २७ कोटी ४८ लाख ७३ हजार १०० रुपयांचा अनुदान निधी दिवाळी पूर्वी माढा तहसीलाला जमा केला होता.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ते बँकेद्वारे थेट वर्ग करा म्हणून सूचनाही दिल्या होत्या. पण निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेच दिवाळीत सलग सुट्या आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची याद्या फायनल झाल्या नाहीत. त्यातच बँकेला सलग सुट्या आल्याने जरी याद्या झाल्या तरी पैसे खात्यावर वर्ग करणार कोण हा प्रश्न निर्माण झाल्याने आतापर्यंत तहसील कार्यालयात याद्याचा घोळ संपला नाही. त्यामुळे दिवाळी अगोदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आलेला निधी दिवाळी नंतरही अद्यापपर्यंत खात्यावर मिळाला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पैसे लवकर येतील म्हणून बाजारपेठेत उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्ग नुकसान भरपाई कधी खात्यावर जमा होणार म्हणून वाट पाहत बसला आहे.

 माढा तालुक्यातील ११७ गावात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता.त्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील माती देखील विविध प्रकारच्या पिकांबरोबर वाहून गेली होती.त्यात नदी व ओढ्या-नाल्यालगतच्या फळबागा व विविध पिकांचे तर खूप मोठे नुकसान झाले होते.त्यात अनेक घरांची पडझड झाली होती.अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली होती तर काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्याचे शासकीय स्तरावरील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमार्फत संबधीत नुकसानीचेपंचनामे केले होते.यावर  विविध संघटनांनी शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईचे अनुदान द्यावे अशी मागणी सरकारकडे केली होती.त्यामुळे शासनाने माढा तालुक्यातील एकूण नुकसान भरपाई अनुदानाच्या निम्म्या हप्त्यापोटी दिवाळी अगोदर निधी तहसीलाला जमा केला होता.त्यामुळे तहसील खात्यात शासनाकडून २७ कोटी ४८ लाख ७३ हजार १०० रुपयांचा निधी नुकसान भरपाई देण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

 निधी जमा झाल्याबरोबरच तहसीलदार राजेश चव्हाण यांनी नुकसानीत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी करणे सुरू केले होते. व दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या  खात्यात रक्कमा जमा होतील असे सांगितले होते. परंतु  सुट्या आल्याने त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करता आली नाही. 

शेतकऱ्यांना जिरायत व आश्वाशीत सिंचनाखाली प्रतिहेक्टरी १० हजार व बहुवार्षिक पिकांना २५ रुपये हजार हेक्टरी मदत दिली जाणार असून लवकर त्यांच्या बँक  खात्यात अनुदान भरपाई पैसे जमा होतील असे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्रDiwaliदिवाळी