शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

बाष्पीभवनामुळे उजनीतील पाणी प्रतिदिन एक टक्का होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:28 IST

सोलापूर जिल्ह्यात टंचाईचे संकेत; नियोजन कोलमडल्याने एप्रिलमध्ये मायनस ३२.५३ टक्क्यांवर !

ठळक मुद्देउजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर, एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहेउपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे, एकूण टीएमसी ४६.२३.गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता

भीमानगर : नियोजनाअभावी उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली असून, यामुळे धरण उघडे पडलेले दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांत आणि एप्रिलमध्येच मायनस ३२.५३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे, शेतकºयांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोल्यासह अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत असून, या पाण्यातून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेलनी तर मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. 

कालवा व बोगद्याचे तोंड बंद पडले असून, आता पाणीच नसल्यामुळे कालवा व बोगद्याकाठच्या शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडल्यानंतर धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे. 

गतवर्षी प्लस २१.८३ टक्के पाणीसाठा- उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे तर उपयुक्त टीएमसी मायनस १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ