शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडे बोट करणाºयांनी स्वत:कडे पाहावे : सरोज पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:25 IST

सुशीलकुमार शिंदे यांच्या टीकेला दिले उत्तर

ठळक मुद्देसोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठकीनिमित्त खासदार सरोज पांडे या सोलापूर दौºयावर खा. पांडे यांनी पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, असे २०१९ चे मिशन डोळ्यासमोर ठेवून क्लस्टर बैठकीचे आयोजन

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. मोदी यांच्याकडे बोट करणाºयांनी स्वत:कडे चार बोटे वळलेली आहेत हे ध्यान्यात घ्यावे, असे प्रत्युत्तर भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठकीनिमित्त खासदार सरोज पांडे या सोलापूर दौºयावर आल्या होत्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खा. सरोज पांडे यांनी पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे, आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अनिवाश कोळी आदी उपस्थित होते.

 त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. पांडे यांनी पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, असे २०१९ चे मिशन डोळ्यासमोर ठेवून क्लस्टर बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असे वक्तव्य केल्याचे निदर्शनाला आणल्यावर खा. पांडे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करण्य्ाांचा कोणालाही नैतिक अधिकार नाही. जे त्यांच्यावर असा आरोप करीत आहेत, त्यांनी पहिल्यापासून स्वत:कडे चार बोटे वळली आहेत हे ध्यान्यात घ्यावे, असे उत्तर दिले. 

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेले तीन दिवस सोलापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.  यादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. बुधवारी तर त्यांनी भाजप मंत्र्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत वक्तव्य केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेस