मुख्यमंत्र्यांना आक्षेपार्ह बोलतोय, कुकरी घेऊन ये रे....याला आता संपवून टाकू; शिवसैनिकांची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 10:11 IST2021-02-08T09:45:53+5:302021-02-08T10:11:22+5:30
भाजपा नेते कटेकर यांना मारहाण; शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांना आक्षेपार्ह बोलतोय, कुकरी घेऊन ये रे....याला आता संपवून टाकू; शिवसैनिकांची धमकी
पंढरपूर : पंढरपुरातील एका आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषण करणाऱ्या भाजपा चे माजी उपजिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांना कुकरी घेऊन ये याला आता संपवून टाकू असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांविरूध्द रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीच्या वतीने लिंक रोड पंढरपूर येथील एम एस सी बी चा गेटच्या बाहेर आंदोलनादरम्यान शिरीष वलभ कटेकर ( वय ६०, रा. नामदेव पायरी जवळ पश्चिम कवठेकर गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी केलेल्या आक्षेपार्ह भाषण केले होते. याचा राग मनात धरून संदीप केंदळे, बाळू देवकर, रवी मुळे, सुधीर अभंगराव, जयवंत माने, वनारे, बुरांडे (सर्व रा. पंढरपूर) यांच्यासह अज्ञात २० ते २५ लोकांनी शिरीष वलभ कटेकर यांच्या डोकयावर व अंगावर निळसर रंगाचा चिकट द्रव पदार्थ टाकला. त्याचबरोबर गळ्यामध्ये हिरव्या रंगाची बांगड्याची माळ गळ्यात टाकून निळ्या रंगाची साडी त्यांच्या डोक्यावर टाकली.
त्यावेळी त्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्वांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्या कार्यकर्त्यांपैकी एक जण कुकरी घेऊन ये याला आता संपवून टाकू असे मोठ्याने म्हणाला. अशी तक्रार कटेकर यांनी पोलिसात दिली आहे. पुढील तपास पो. नि. अरुण पवार करीत आहेत.