मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन
By दिपक दुपारगुडे | Updated: October 26, 2023 16:50 IST2023-10-26T16:48:56+5:302023-10-26T16:50:02+5:30
राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. दररोज एक गावातील नागरिक आंदोलन करणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील २१ गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केली आहे.
राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात मराठा समाजाचे समन्वयक संतोष गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रभाकर डोके, प्रमोद डोके, मुकेश बचुटे, लक्ष्मण जाधव, नागेश भोसले, राहुल देशमुख, चिंतामणी देशमुख, डॉ. कौशिक गायकवाड, सत्यवान देशमुख, डॉ. प्रमोद पाटील, सोमनाथ पवार, ॲड श्रीरंग लाळे, काका भोसले, बाळासाहेब पवार, ॲड. हेमंत शिंदे आदी या अंदोलनात सहभागी झाले आहेत.
या गावात राजकीय नेत्याना बंदी
वडवळ, साबळेवाडी, मोहोळ, अंकोली, पापरी, ढोकबाभूळगाव, वाळूज, शेज बाभूळगाव, वरकुटे, औढी, अर्धनारी, कामती, खुर्द, अर्जुनसोंड, पोफळी, नांदगाव, कोथाळे, भोयरे, मसले चौधरी, भांबेवाडी, वाघोली, वाफळे येथून अंदोलनास पाठिंबा मिळत आहे. धनगर समाज संघटनेचे अनंता नागणकेरी, नागेश वनकळसे, रामभाऊ खांडकर, भीम प्रतिष्ठानचे संस्थापक विनोद कांबळे, राहुल तावसकर, अमोल महामुनी यांनी गावबंदीचा इशारा दिला आहे.