शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन तरुणीला घरी आणले, तिने छळाला कंटाळून आयुष्य संपवले, मृतदेह अर्धवट शेतात पुरला अन् सगळ्या प्लानचा उलघडा झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:07 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला

कुसळंब : लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथून पळवून आणलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. प्रकरण अंगलट येईल या भीतीने तिला पळवून आणणाऱ्या मुलाने तिचा मृतदेह शेतात पुरला. मात्र मृतदेह अर्धवट अवस्थेत बाहेर आढळला आणि ही बाब पोलिसांपर्यंत गेली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता बेपत्ता मुलीने छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण बाहेर आले. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी अभिषेक आश्रुबा बांगर आणि आई सोजरबाई बांगर (दोघे रा. मुंडेवाडी, जि. बीड) या मायलेकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना २९ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

धक्कादायक! चष्म्यांचा वापर करून मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, हॉटेलमधील प्रायव्हेट व्हिडीओ होत आहेत लीक

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी ही शिक्रापूर (पुणे) येथे नातेवाइकांकडे राहत होती. १६ जुलै २०२५ दरम्यान ती बेपत्ता झाली होती. तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपी अभिषेक आश्रुबा बांगर (रा. मुंडेवाडी, जि. बीड) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तो तिला बार्शी तालुक्यात तुर्कपिंपरी येथील साखर कारखान्यावर ऊसतोडीच्या कामासाठी घेऊन आला.

१६ जुलै रोजी पळून गेले होते

१६ जुलै २०२५ रोजी झाली होती बेपत्ता कारखान्यावरील खोपीत (झोपडीत) राहू लागले. मुलीला स्वयंपाक येत नाही, ऊसतोडीचे काम जमत नाही, या कारणावरून अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून तिने १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते १४ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान आडूला गळफास आत्महत्या केली. खोपीतील ओढणीने लावून तिने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच, पोलिस कारवाईच्या भीतीने आरोपींनी तिचा मृतदेह बैलगाडीत घालून तुर्कपिंपरी साखर कारखान्याजवळील एका शेतात नेला. तेथे खड्डा खणून पुरून टाकला.

पैंजणांवरून ओळख पटली

२९ जानेवारी २०२६ रोजी तुर्कपिंपरी परिसरात एका मुलीचा अर्थवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी मुलीच्या पायातील पैंजणांवरून तिची ओळख पटवली. पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने छळाची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मायलेकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसणे हे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Girl Commits Suicide After Harassment; Body Buried Secretly.

Web Summary : A 17-year-old girl, lured by marriage, committed suicide due to harassment from her boyfriend and his mother. They secretly buried her in a field. Police investigation revealed the crime; the pair are now charged with abetment to suicide and destroying evidence.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरBeedबीडPoliceपोलिस