शेवटच्या काही मिनिटांत उडाली धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:28+5:302021-01-08T05:09:28+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा महत्त्वाच्या टप्प्यात वैचारिक एकोपा दिसून येतो; मात्र यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची शेवटच्या ...

शेवटच्या काही मिनिटांत उडाली धावपळ
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा महत्त्वाच्या टप्प्यात वैचारिक एकोपा दिसून येतो; मात्र यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू असलेली खलबते तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू होती. अनेक ठिकाणी काही मोजकी नेतेमंडळी उमेदवारांचे मनधरणी करून अर्ज माघारी घेण्यासाठी गळ घालताना दिसत होती. यामध्ये काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही गावांमध्ये सदस्य बिनविरोध झाले; मात्र अनेक ठिकाणी या चर्चांना अपयश आल्यामुळे अखेर निवडणुकीच्या रोमहर्षक लढती बघायला मिळणार आहेत.
-------
उमेदवारांनी चिन्हे घेत धरली गावाची वाट
गेल्या काही दिवसांपासून अनेक गावात बिनविरोध निवडणुकांची खलबते सुरू होती. साम, दाम, दंड याबरोबरच वेगवेगळी आश्वासने दिली जात होती. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आपला पवित्रा बदलून निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला; मात्र बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये चर्चेच्या फैरी निष्फळ ठरल्या. त्यामुळे मुदत संपताच उमेदवारांनी आपली चिन्हं घेत गावाची वाट धरली.
-----
फोटो ::::::::::::::::::::::
माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परिसरात होत असलेल्या चर्चेच्या फैरी.