शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

ऑनलाइन अभ्यासासाठी सोलापूर शहरात लॅपटॉप् तर ग्रामीण भागात मोबाईल ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:56 IST

पालकांना आता नवीनच चिंता; मुलांच्या डोळ्यांचे प्रश्न येऊ लागले चर्चेत.. 

ठळक मुद्देशैक्षणिक संस्था सुरू करण्यास अडचणी येत असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबण्यात येत आहेमुलांचा स्क्रीन टाईम (मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी) वाढत आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतोकॉम्प्युटर व मोबाईलमधून ‘ब्लू रे’ आणि ‘शॉर्ट वेव लेंथ’ची किरणे डोळ्यांवर विपरीत परिणाम करतात

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे शासनाला शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे मुलांना ऑनलाइनशिक्षण देण्याचा सर्वत्र पुकारा होत असताना, शिवाय प्रत्यक्षात या प्रकारचे शिक्षण सुरूही झाले असताना पालकांना मात्र आपल्या लहानग्यांच्या डोळ्यांची चिंता सतावत आहे.

यामुळे त्यांचे डोळे खराब तर होणार नाहीत ना? या भीतीने बाजारपेठेत लॅपटॉप, संगणकाची मागणी वाढत आहे. पण चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे या दोन्हींच्या किमती वाढल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी मीटिंग अ‍ॅप, व्हिडिओ क्लिप्स अन् व्हाईस रेकॉर्डिंगसारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे लॅपटॉप अन् कॉम्प्युटर्सही महागले.

ऑनलाइन शिक्षणासाठी साधारणपणे पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते नऊ, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना सकाळी नऊ ते १० तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी एक अशी वेळ ठरविण्यात आली आहे. वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे शक्य झाले आहे. बहुतांश घरी आॅनलाईन अभ्यासासाठी मुले आईचाच मोबाईल वापरतात.

गणिताच्या धड्यासाठी रिअर कॅमेºयाचे सोल्युशनबहुतांश सगळ्या विषयांसाठी फक्त फ्रंट (समोरचा) कॅमेरा वापरला जातो. गणित विषय हा प्रात्यक्षिक करूनच शिकवावा लागतो. यासाठी शिक्षकांतर्फे रिअर (मागचा) कॅमेºयाचा वापर करण्यात येत आहे. गणितातील एखादी संकल्पना समजावून सांगताना समोरच्या कॅमेºयात पाहून सांगण्यात येते, तर गणित सोडविताना वहीवर मोबाईलच्या मागील कॅमेºयाचा वापर करून गणित समजावून सांगतिले जात आहे.

शैक्षणिक संस्था सुरू करण्यास अडचणी येत असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबण्यात येत आहे. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम (मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी) वाढत आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. कॉम्प्युटर व मोबाईलमधून ‘ब्लू रे’ आणि ‘शॉर्ट वेव लेंथ’ची किरणे डोळ्यांवर विपरीत परिणाम करतात. तसेच डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी झाल्याने डोळे कोरडे पडतात. हे टाळण्यासाठी ‘ब्लू ब्लॉकिंग’चा विशिष्ट असा चष्मा घालावा. स्क्रीन पाहताना डोळ्यांची उघडझाप करावी, स्क्रीन डोळ्यांच्या खालच्या पातळीवर असावी, अक्षरांचा फाँट मोठा असावा, डोळ्यांची जळजळ होत असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.    - डॉ. उमा प्रधान, नेत्ररोग तज्ज्ञ

शिक्षक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतात व्हिडिओकोरोना आजार येण्याच्या आधीपासूनच अनेक शिक्षक हे तंत्रस्नेही झाले आहेत. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग आता विद्यार्थ्यांना होत आहे. पाठासंबंधीची माहिती स्वत: कॅमेºयासमोर थांबून शूट केले जाते. हा व्हिडिओ तयार करून पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येतो. एखादा भाग समजला नसल्यास विद्यार्थी हे पुन्हा व्हिडिओ पाहतात. यासोबतच यूट्यूबवर आधीपासूनच व्हिडिओ तयार असून, गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याची लिंक पाठविण्यात येते.

स्मार्टफोन नसणाºया विद्यार्थ्यांचे काय?वर्गात शिकविण्यापेक्षा जास्त चांगला पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनामुळे अशी वेळ आल्याने आॅनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे अभ्यासाच्या सूचना देण्यात येतात. एखाद्या दिवशी कोणता धडा शिकवून झाला याची माहिती स्मार्टफोन असणारे विद्यार्थी इतर मित्रांना देतात. घरचा अभ्यास दिल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळी तपासण्यासाठी बोलावले जाते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइनEducationशिक्षणeye care tipsडोळ्यांची काळजी