शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला, या बाहेरच्यांना सरकारने शोधावे - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 18:24 IST

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

सोलापूर - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. अकलूज येथील रत्नाची महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. 

(आणखी वाचा - कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर )

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यथाही शरद पवारांनी त्यांच्या भाषणात मांडली. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा विचार करते आहे. सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे असेही शरद पवारांनी म्हटले. 

कर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना 80 हजार कोटी कसे दिले? सरकारकडे शेतकऱ्यांच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत आणि बँकांच्या तूट भरायला पैसे कुठून आले?, असा प्रश्न उपस्थित करत, कोणाच्या कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पवार यांनी घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी देशाच्या कृषी आणि आर्थिक धोरणावर सडकून टीका केली. देशाचा विकासदर घसरला असून, कृषी आणि औद्योगिक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला असल्याचे पवार यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र,  सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBhima-koregaonभीमा-कोरेगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस