विकलेल्या घराचा जादा मोबदला द्या म्हणत काकाच्या पोटात खुपसला चाकू

By रूपेश हेळवे | Updated: April 5, 2023 15:06 IST2023-04-05T15:06:38+5:302023-04-05T15:06:58+5:30

दोन वर्षापूर्वी विकलेल्या घराच्या जागेच्या पोटी जादा मोबदला मागत पुतण्याने काकाच्या पोटात चाकू खुपसत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

knife stuck in uncle stomach saying to pay more for the sold house | विकलेल्या घराचा जादा मोबदला द्या म्हणत काकाच्या पोटात खुपसला चाकू

विकलेल्या घराचा जादा मोबदला द्या म्हणत काकाच्या पोटात खुपसला चाकू

रुपेश हेळवे, सोलापूर : दोन वर्षापूर्वी विकलेल्या घराच्या जागेच्या पोटी जादा मोबदला मागत पुतण्याने काकाच्या पोटात चाकू खुपसत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अर्जुन लगमाण्णा कानकुर्ती ( वय ५७, रा. पद्मा टॉकीज परिसर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून उमाकांत विठ्ठल कानकुर्ती (रा. दाजी पेठ) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अर्जुन कानकुर्ती हे कन्ना चौकातील श्री मडीवाळेश्र्वर माचदेव मंदिर परिसरात ४ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बसलेले असताना आरोपी उमाकांत कानकुर्ती हा घटना स्थळी येऊन अर्जुन यांच्याशी वाद घालू लागला. तसेच दोन वर्षापूर्वी विकलेल्या घर जागेपोटी आणखीन वाढीव पैसे द्या म्हणत सतत तगादा लावत होता. त्यावेळी अर्जुन यांनी वाढीव पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन त्याने चाकूने फिर्यादीच्या छातीवर व पोटाच्या उजव्या बाजूस चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाची फिर्याद अर्जुन यांनी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: knife stuck in uncle stomach saying to pay more for the sold house