Kittens trapped in caramboard holes rescued | कॅरमबोर्डच्या छिद्रात अडकलेल्या मांजराच्या पिलाची झाली सुटका

कॅरमबोर्डच्या छिद्रात अडकलेल्या मांजराच्या पिलाची झाली सुटका

ठळक मुद्दे- एका घरामध्ये कॅरम बोर्ड खाली काढण्यात आले होते- बोर्डच्या छिद्रामध्ये मांजराचे पिलू अडकले- पिलाच्या डोळ्यावर कापड टाकून दुसºया एका कापडाच्या साह्याने त्यास अलगद त्या छिद्रातून बाहेर काढले

सोलापूर : बाळे येथील डांगे नगर येथे एका घरात भिंतीला उभे करून ठेवलेल्या कॅरमबोर्डच्या छिद्रातून एक मांजराचे पिलू अडकले. बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची मान छिद्रातून निघत नव्हती. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी मांजराच्या पिलाची सुटका केली.

एका घरामध्ये कॅरम बोर्ड खाली काढण्यात आले होते. बोर्डच्या छिद्रामध्ये मांजराचे पिलू अडकले. सुटकेसाठी त्या पिलाची धडपड सुरू झाल्याने भिंतीला उभा केलेला कॅरम बोर्ड पडला. 

बाहेर निघण्याच्या प्रयत्नात ते पिलू अधिकच घट्ट अडकल्याने त्यास पुन्हा माघारी फिरता येईना. त्या छिद्रातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात सुटका करण्यासाठी जाणाºयांना पंजाद्वारे ओरखडत असल्याने त्यास मदतीसाठी कुणी पुढे आले नाही.  संतोष धाकपाडे, सोमानंद डोके, सुरेश क्षीरसागर यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्या पिलाच्या डोळ्यावर कापड टाकून दुसºया एका कापडाच्या साह्याने त्यास अलगद त्या छिद्रातून बाहेर काढल्याचे सांगितले. 

Web Title: Kittens trapped in caramboard holes rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.