सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे किशोर नावंदे यांची पुण्याला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 17:31 IST2018-05-25T17:31:22+5:302018-05-25T17:31:22+5:30

Kishor Naunde of Solapur taluka police station changed Pune | सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे किशोर नावंदे यांची पुण्याला बदली

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे किशोर नावंदे यांची पुण्याला बदली

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे़ याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांच्या सहीने निघाला आहे़ 

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (२) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस आस्थापना मंडळ क्र २ यांनी विशेष बाब म्हणून नि:शस्त्र पोलीस निरीक्षकाच्या बदल्या केल्या़ यात सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे याचा समावेश आहे़ 

Web Title: Kishor Naunde of Solapur taluka police station changed Pune