शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून ११ वर्षाच्या मुलाचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 21:13 IST

मामाची पोलीस ठाण्यात धाव : क्रिकेट खेळायला गेला तर परतलाच नाही

विलास जळकोटकर / सोलापूर : क्रिकेट खेळायला बाहेर गेलेल्या ११ वर्षाच्या मुलास फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार शहरातील आशानगर परिसरात उघडकीस आला. श्रेयस प्रकाश पावले (वय- ११) असे अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी मुलाचे मामा सुभाष राजशेखर चिट्टे (वय- ३६, आशानगर, बसवेश्वर चौक, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचा भाच्चा श्रेयस हा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानावर क्रिकेट खेळायला म्हणून गेला. ते मित्रांसोबत खेळत असताना काही वेळानं त्यानं मित्रांना माझे मामा आले आहेत मी दुसरीकडे क्रिकेट खेळायला जातो म्हणून निघून गेला.

रात्री उशीर झालातरी श्रेयस परत न आल्याने साचे नातलग चिंतेत पडले. सर्व नातलगांकडे चौकशी केली. रात्र उलटून गेली तरी सकाळीही तो परत आला नाही. यामुळे फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भाच्च्याला फूस लावून कोणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी तपास फौजदार व्ही. एस. बनसुडे करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर