शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

खाकी वर्दीकडून जोपासला जातोय कायद्याबरोबर प्राणीमित्राचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 7:50 PM

नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भगत यांची यशोगाथा: जखमी प्राण्यांवर उपचार करीत बजावतात आपली ड्यूटी

ठळक मुद्दे मूळचे वेळापूर येथील अमोल भगत यांना  लहानपणापासूनच सर्प व प्राणी या विषयीची अगळी उत्सुकताबीड येथे नोकरी बजावल्यानंतर नुकतीच त्यांची नातेपुते येथे बदली झाली आत्तापर्यत त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या सुमारे ४ हजार सर्पांना त्यांनी पकडून जंगलात सोडून दिले

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : हॅलो...आमच्या गल्लीत चोर घुसलेत, अपघात झाला आहे. असा फोन येणे पोलिसांना  नवीन नाही. फोन येताच पोलीस मदतीला पोहोचतात देखील; मात्र हॅलो ... साहेब आमच्या गल्लीत, घरात मोठा साप आलाय या फोन आला की नातेपुुते पोलीस स्टेशनचे पो.कॉ. अमोल भगत हे तत्काळ धावून जातात.

 सापांच्या विविध जाती, त्याच्याविषयी समज-गैरसमज, श्रद्वा व  अंधश्रद्वा याविषयी जागृती व जखमी प्राण्यांवर उपचार अविरतपणे करीत आपली ड्यूटी बजावत  आहेत.

 मूळचे वेळापूर येथील अमोल भगत यांना  लहानपणापासूनच सर्प व प्राणी या विषयीची अगळी उत्सुकता होती. लहानपणी गवती साप पकडला व सोडला. त्यावेळेपासून त्यांना छंद जडला, पुढे त्यांनी २०१०  साली पोलीस खात्यात नोकरी सुरु केली. बीड येथे नोकरी बजावल्यानंतर नुकतीच त्यांची नातेपुते येथे बदली झाली आहे. आत्तापर्यत त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या सुमारे ४ हजार सर्पांना त्यांनी पकडून जंगलात सोडून दिले आहे. तर वेगवेगळ्या कारणाने जखमी झालेल्या  हरीण, काळविट, उद मांजर, मोर, माकड अशा वेगवेगळ्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडले आहे.

सापाच्या बाबतीत समाजात असणाºया अंधश्रद्धा बाबतीत जागृती करून साप हा निसर्गचक्राचा कसा महत्त्वाचा घटक आहे, ते भगत पटवून देतात.  एकदा नाग पकडून सोडायला जात असताना ते स्वत: पडले व नाग सुटला. त्याने फणा त्यांच्या तोंडासमोर उगारला; मात्र त्यांनी श्वास रोखून धरत हालचाल केली नाही. थोड्या वेळाने त्याने फणा खाली घेतला व निघून गेला. अशा अनेक रोमहर्षक प्रसंगांना तोंड देत छंद जोपासणारे भगत हे  सार्वजनिक ठिकाणी फलक लावून जागृतीचे काम करीत आहेत. 

प्राण्यांचे संरक्षण, संगोपन करावे- निसर्गचक्रातील प्राण्याचे संरक्षण करावे तसेच साप घराजवळ आढळल्यास त्यास इजा करू नका किंवा माहिती नसताना निष्काळजीपणे पकडण्याचा प्रयत्न करू नका. याबाबतच्या अंधश्रद्धा जाणून घेऊन शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून सर्व प्राणी व सर्पाबरोबर मित्रत्वाचे नाते जोपासणे गरजेचे असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भगत यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसsnakeसाप