Keep children away from mobiles ... Follow the mobile manners at home! | Children's Day Special; मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा... घरात तुम्हीही मोबाईल मॅनर्स पाळा !
Children's Day Special; मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा... घरात तुम्हीही मोबाईल मॅनर्स पाळा !

ठळक मुद्देमोबाईलचा अतिवापर हाच आता एक आजार बनलामोबाईलची सवय लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळांकडूऩ मैदानावर जाण्याचे प्रमाण खूप कमी झाले

सोलापूर : मोबाईलचा अतिवापर हाच आता एक आजार बनला आहे आणि हा आजार लहान मुलांमध्ये अधिक आहे़ मोबाईलची सवय लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे़ यातून शालेय विद्यार्थी मैदानी आणि शारीरिक कसरतीच्या खेळांना विसरत चाललेत़ ना पालकांकडून याचे प्रयत्न सुरु आहेत ना संबंधित शाळांकडूऩ मैदानावर जाण्याचे प्रमाण खूप कमी झाले़ त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडताहेत़ मोबाईलच्या व्यसनातून मुलांना बाहेर काढण्यासाठी नवीन काळाचे नवे मोबाईल्स मॅनर्स शिका, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ प्रसन्न खटावकर यांनी दिला.

डॉ़ प्रसन्न खटावकर सांगतात़, मोबाईल संबंधित अलीकडच्या दोन घटनाक्रम विचित्र आहेत़ पहिला, जागतिक आरोग्य संघटनेने मोबाईलचा अतिवापर हाच एक गंभीर आजार असल्याचा निर्वाळा दिला़ दुसरी, दोन दिवसांपूर्वी केरळ सरकारने इंटरनेट सेवेला जीवनावश्यक वस्तंूच्या यादीत समावेश केला़ दोन्ही घटनाक्रम चिंताजनक आहेत, विशेष करून घरातील लहान मुलांकरिता़ व्यसनात मेंदूचा जो भाग उत्तेजित होतो तोच भाग मोबाईलचा वापर करताना होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ त्यामुळे युवक आणि मुलं वारंवार मोबाईलच्या वापर करताना दिसतात़ मुलांमध्ये मोबाईलची इतकी सवय झाली की ते सकाळी उठल्याउठल्या ते मोबाईलची मागणी करतात़ जेवताना मोबाईल मागतात़ दिवसातून तीन-चार तास ते मोबाईलवर असतात़ ही सवय अत्यंत घातक आहे.

 मुलांच्या हातात फोन देऊ नका़ त्यांच्याशी संवाद साधत रहा़ त्यांना मैदानाकडे घेऊन जा़ बागबगीच्याची सफर घडवा़ थिएटरमध्ये मुव्ही बघायला जा़ नाटके पाहा़ त्यांना पुस्तक वाचनाची सवय लावा़ मुलांना त्यांच्या मित्रांसोबत खेळायला पाठवा़ त्यांना पाठांतराची सवय लावा़ त्यांना बोलते करा़ नृत्य क्लासला पाठवा़ चित्रकलेची आवड निर्माण करा़ क्रिकेटची गोडी निर्माण करा़ करण्यासारखे भरपूर आहे, फक्त पालकांनी सजगपणे पाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि विशेष म्हणजे, मुलांसमोर मोबाईलचा कमीत कमी वापर पालकांनी करावा.

असे मोबाईल मॅनर्स स्वीकारा

 • - सर्वप्रथम पालकांनी मोबाईलचा वापर कमी करा.
 • - विशिष्ट वेळेत आणि मर्यादित वापर करा.
 • - घरात आल्याबरोबर डिजिटल मोबाईल स्वीच आॅफ करा.
 • - घरातील साध्या फोनवर कॉल्स फारवर्ड करा.
 • - मोबाईलवर न्यूज, व्हिडिओ अन् चित्रपट बघण्यापेक्षा टीव्हीवर पाहा.
 • - जेवताना मोबाईल वापरुच नका.
 • - मुलांच्या हातात फोन देताना प्ले स्टोअरमधील पॅरेन्टल कन्ट्रोल्स फंक्शन आॅन करा.
 • - शेअर्स आणि सेल्फी फॅड डोक्यातून काढून टाका.
 • - फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ठराविक वेळेतच बघा.
 • - मोबाईल खूप काही आहे असे मुलांना दाखवू नका.
   
Web Title: Keep children away from mobiles ... Follow the mobile manners at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.