शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

इंधन अन् पर्यावरण बचतीसाठी केदार ने बनविले ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स’

By appasaheb.patil | Updated: February 17, 2020 14:45 IST

विज्ञान प्रदर्शन; हरिभाई देवकरण प्रशालेच्या केदार कामतकरची भन्नाट कल्पना

ठळक मुद्देहरिभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थी केदार कामतकर याने तयार केलेले ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’ हे उपकरण राज्यस्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातही यशस्वी ठरल्याने त्याची दिल्ली येथे देशपातळीवर होणाºया प्रदर्शनासाठी निवड प्रदूषण अन् इंधनाची अतिरिक्त गरज या प्रमुख समस्यांना देशाला सामोरे जावे लागणार आहे

सुजल पाटील

सोलापूर : देशातील वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार, अशी भीती निर्माण झाली आहे. प्रदूषण अन् इंधनाची अतिरिक्त गरज या प्रमुख समस्यांना देशाला सामोरे जावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर इंधनाची बचत व्हावी त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या नववीत शिकणाºया केदार कामतकर या विद्यार्थ्याने भन्नाट कल्पनेतून उपकरण तयार केले आहे़ त्या उपकरणाचे नाव आहे ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’.

देशात रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे़ दिवसेंदिवस वाहनांची संख्या देखील वाढत आहे़ त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर्स तयार केले आहेत़ आता या स्पीड ब्रेकर्समुळे सुध्दा अपघात होत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे़ भारतात अनेक शाळा, महाविद्यालये रस्त्यांच्या कडेला असतात़ शाळा परिसरात कायमस्वरूपी स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात आले आहेत.

 ज्यावेळी शाळा, कॉलेज बंद असतात त्यावेळी वाहनांना स्पीड ब्रेकर्समुळे वेग कमी करावा लागतो, त्यामुळे जास्तीच्या इंधनाचे ज्वलन होऊन वातावरणात धूर सोडला जातो अन् साहजिकच प्रदूषण होते़ हे होऊ नये म्हणून जेव्हा शाळा, कॉलेज बंद असतात तेव्हा ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स जागच्या जागी फिरतात आणि त्यापासून सरळ रस्ता तयार होतो़ त्यामुळे वाहनांना आपला वेग कमी करावा लागत नाही परिणामी इंधनाची बचत होऊन धूर न झाल्याने प्रदूषण कमी होते, अशी माहिती उपकरण बनविणारा विद्यार्थी केदार कामतकर याने सांगितले़ 

जिल्हा़... राज्य अन् आता राष्ट्रीय पातळीवऱ...- हरिभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थी केदार कामतकर याने तयार केलेले ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’ हे उपकरण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरले. त्यानंतर सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञ महाविद्यालय, अमरावती व नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातही यशस्वी ठरल्याने त्याची दिल्ली येथे देशपातळीवर होणाºया प्रदर्शनासाठी निवड झाली़ या उपक्रमाचे कौतुक राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह मार्गदर्शक विज्ञान शिक्षक गौतम कांबळे, शहाणे, कलाशिक्षक कोरवलीकर, मुख्याध्यापक पी़ जी़ चव्हाण, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी केले़ 

मी तयार केलेल्या ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’ या वैज्ञानिक उपकरणामुळे वाहनांचे इंधन व वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे़ शासनाने अशाप्रकारचे स्पीड ब्रेकर तयार केल्यास प्रदूषण थांबण्यास मदत होईल, तसेच इंधनाची फार मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे़ भविष्यात निर्माण होणारा इंधन तुटवडा व वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागू नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने या उपकरणाची दखल घ्यावी़- केदार मनोज कामतकर, विद्यार्थी, हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणPetrolपेट्रोलscienceविज्ञानSchoolशाळाEducationशिक्षण