राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 15:05 IST2022-06-08T15:05:44+5:302022-06-08T15:05:54+5:30

संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

Kaustubh Talikhede of Solapur won a bronze medal in the state level fencing competition | राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला कांस्य पदक

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला कांस्य पदक

सोलापूर : नांदेड येथे सुरू असलेल्या ३० व्या ज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कौस्तुभ तळीखेडेला कांस्य पदक मिळाले.

या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या मुलांच्या फॉइल सांघिक प्रकाराला कांस्य पदक प्राप्त झाले. त्यात कौस्तुभ तळीखेडेचा समावेश होता. तो श्री समर्थ स्पोर्टस् नर्सरीचा खेळाडू आहे. त्याला समर्थ स्पोर्ट्सचे राजेंद्र माने, अजिंक्य माने, अक्षय माने, सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले. कौस्तुभ तळीखेडे याने यापुर्वी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने आतापर्यंत विविध मेडल्स जिंकून सोलापूरचे नाव उज्वल केले आहे. कौस्तभ तळीखेडे हा सध्या संगमेश्वर महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत आहे. 

Web Title: Kaustubh Talikhede of Solapur won a bronze medal in the state level fencing competition