शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग सगळयांच्याच गुडघ्याला! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:09 IST

मामाश्री गायकवाड विजयपूर : काँग्रेस,भाजप, निजद हया  तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा करीत तारीख जाहीर केली आहे. सिद्धरामय्या, येडियुराप्पा व कुमारस्वामी यांच्यापैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार, कर्नाटकातील मतदार कोणाच्या मागे उभे राहणार हे १५ मे रोजी स्पष्ट होणार आहे.मतदानाला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. २२४ जागांसाठी २,६५५ ...

ठळक मुद्देकर्नाटकातील जनता कितपत प्रतिसाद देईल हे येणारा काळ ठरविणार कर्नाटकातील मतदार कोणाच्या मागे उभे राहणार

मामाश्री गायकवाड विजयपूर : काँग्रेस,भाजप, निजद हया  तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा करीत तारीख जाहीर केली आहे. सिद्धरामय्या, येडियुराप्पा व कुमारस्वामी यांच्यापैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार, कर्नाटकातील मतदार कोणाच्या मागे उभे राहणार हे १५ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

मतदानाला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. २२४ जागांसाठी २,६५५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २१९ महिला व २,४३६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस,भाजप व निजदने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस, व निजदने या दोन्ही पक्षांनी रोजगारनिर्मिती, कृषीक्षेत्र, महिला सबलीकरण आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचे जाहीर केले आहे. भाजप सत्तेवर आल्यास राष्ट्रीयीकृत बँकेतील शेतकºयाचे कर्ज माफ करण्याची घोषणा जाहीरनाम्यात केले आहे. काँग्रेस-निजदने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरही यामधील तरतुदींवर मतदारांमध्ये फारसा उत्साह किंवा चर्चा होताना दिसत नाही. वेगवेगळया भागात वेगवेगळया मुद्दांवर चर्चा होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत नमोंनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुती करीत कोणत्याही परिस्थितीत घटना बदल करणार नाही, असे जाहीर केले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दीड-दोन महिन्यापूर्वी घटना बदलण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप विरुद्ध दलितांचा असंतोष भडकला होता. ही गोष्ट लक्षात ठेवून चिकोडीत नमोंनी दलित कार्डचा वापर केला आहे. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांना त्यांचे महत्त्व काय कळणार असा सवाल उपस्थित करून दलितांमधील असंतोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या नरेंद्र मोदी व सिद्धरामय्या यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नमोंचा प्रत्येक वार परतवण्याचा प्रयत्न सिद्धरामय्यांनी सुरू ठेवला आहे. कारण यासाठी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव जाणवू लागला आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानेच सिद्धरामय्या स्वत:च उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

१२ मे रोजी २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. आजपर्यत जितके सर्वेक्षण झाले त्यामध्ये कर्नाटकात त्रिशंकू अवस्थेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही प्रमुख पक्षातील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांनी शपथविधीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. भाजपने तर दोन वषार्पूर्वीच येडियुराप्पा यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्रीपदाचे येडियुराप्पा  हेच उमेदवार असतील असे जाहीर केले होते. त्यामुळेच की काय येडियुराप्पा यांनी निकालाआधीच शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. १५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

१७ किंवा १८ मे रोजी आपण भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसमक्ष कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहे. आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे.माजी मुख्यमंत्री व निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनीही १८ मे रोजी आपण कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहोत, असे जाहीर केले आहे. त्या दिवशी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा वाढदिवस आहे. आपल्या वडिलांच्या वाढदिनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्नाटकाची सत्तासूत्रे आपण आपल्या हाती घेणार आहे. आपल्याला मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा त्यांना विश्वास वाटतो. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही तारीख ठरविण्यात मागे नाहीत. १५ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात आपणच मुख्यमंत्री होणार, असे सांगणाºया सिद्धरामय्या यांनी त्यासाठी १८ मे ची तारीख निश्चित केली आहे.

१२ मे २०१८ रोजी संपूर्ण कर्नाटक राज्यात मतदान होणार आहे. त्यानंतर १५ मे २०१८ रोजी मतमोजणी होऊन कर्नाटकातील चित्र स्पष्ट होणार आहे. तरीही या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा करीत तारीख जाहीर केली आहे. सिद्धरामय्या, येडियुराप्पा व कुमारस्वामी यांच्यापैकी कोणाचा विश्वास खरा ठरणार, कर्नाटकातील मतदार कोणाच्या मागे उभे राहणार हे १५ मे रोजी स्पष्ट होणार आहे. तरीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या या तीन नेत्यांच्या मनातील उत्साह ओसंडून वाहात आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोणकोणत्या मुद्दयांना प्राधान्य द्यायचे, कोणते मुद्दे तातडीने हाताळायचे, कोणाला जवळ करायचे, कोणाला दूर ठेवायचे, कोणाची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायची, याचे आडाखे बांधण्यात हे तिन्ही नेते मश्गूल आहेत. आपल्याच पक्षाला कर्नाटकाची सत्तासूत्रे मिळावीत, यासाठी मतविभागणीच्या कामाला नेत्यांनी सुरुवात केली आहे. निजदपासून अल्पसंख्याकांना तोडण्यासाठी निजद हे भाजपची ह्यबीह्ण टीम आहे, असे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वारंवार म्हटले आहे. यामागे काँग्रेसचे गणितच वेगळे आहे, हे लक्षात येताच एच. डी. देवेगौडा यांनी निकालानंतर कुमारस्वामी यांनी जर भाजपशी युती केली तर कुमार हा आपला मुलगाच नाही असे समजून त्याला घराबाहेर काढू असे जाहीर केले. ह्यडॅमेज कंट्रोलह्णचा एक भाग म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांचे उघडपणे कौतुक करून नव्या समीकरणाची मांडणी केली आहे. सिद्धरामय्या हे प्रत्यक्षात देवेगौडा यांच्या तालमीत तयार झालेले नेते असले तरी त्यांना ध्रुतराष्ट्राची उपमा देत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. नमोंनी देवेगौडांचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोडलेल्या बॉम्बने कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुमारस्वामी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात छुपी युती झाली आहे. हे दोघे एकाच विमानातून दिल्लीला गेल्याचे पुरावे आपल्याजवळ आहेत, असे सांगत सिद्धरामय्या यांनी निजद आणि भाजप एकच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे दलित, अल्पसंख्याकाना काँग्रेसकडे जखडून ठेवण्याची खेळी आहे. नमोंनी देवेगौडा यांचे केलेले कौतुक, देवेगौडा यांनी नम्रपणे या कौतुकाचा स्वीकार करीत सिद्धरामय्या यांनी पावलोपावली आपला अपमान केला. 

नरेंद्र मोदी यांनी केलेले आपले कौतुक फार महत्त्वाचे नसले तरी त्यांनी बाळगलेले तारतम्य व दाखवलेले सौजन्य योग्य आहे, असे देवेगौडा यांनी सांगितले. यामागे वक्कलिग समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण टाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मतदारांना जखडून ठेवण्यासाठी राजकीय पक्षांचे गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते कामाला लागले आहेत.काँग्रेस आणि जनता दल-एस मध्ये या मतांवर डोळा ठेवून संघर्ष आहे. या निधर्मी जनता दलाने जास्तीत जास्त उमेदवारी देवेगौडांच्या नातेवाईकांना देऊन फॅमिली राजची जोरदार तयारी चालविली आहे. त्याला कर्नाटकातील जनता कितपत प्रतिसाद देईल हे येणारा काळ ठरविणार  आहे. 

आपण कितीही निधर्मी वा सेक्युलर असल्याचे ढोल कोणत्याही राजकीय नेत्याने बडविले तरीदेखील निवडणुका म्हटल्यानंतर उमेदवारीदेखील जात, पात व धर्म या विषयावरूनच ठरते. त्याही पलीकडे जाऊन अलीकडे जनता व मतदारदेखील या गोष्टींचा पहिला विचार करतात. दुसरा विचार पक्षाचा आणि तिसरा विचार उमेदवारांतील गुणांचा. राजकारणाचा हा दर्जा घसरायला जबाबदार आपण सर्वजण आहोतच परंतु सेक्युलरवादाच्या सर्वच पक्षांचा बुरखा हा २०१८ च्या या निवडणुकीत टराटरा फाडला गेला, हे सत्य आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८