जुन्या पेन्शन महामोर्चात अवतरला "कांतारा"; महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पथनाट्याद्वारे वेधले लक्ष
By Appasaheb.patil | Updated: March 18, 2023 18:43 IST2023-03-18T18:43:08+5:302023-03-18T18:43:49+5:30
"कांतारा"च्या वेशभूषेतील महानगरपालिकेच्या शिक्षकानी लक्ष वेधले.

जुन्या पेन्शन महामोर्चात अवतरला "कांतारा"; महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पथनाट्याद्वारे वेधले लक्ष
सोलापूर : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सोलापुरात शनिवारी काढण्यात आलेल्या महामोर्चात महापालिकेचे शिक्षक सहभागी झाले होते. "कांतारा"च्या वेशभूषेतील महानगरपालिकेच्या शिक्षकानी लक्ष वेधले.
शासनाला जागे करण्याच्या उद्देशाने या मोर्चात विशाल मनाळे यांनी 'कांतारा'ची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. शासनाने २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आर्त हाक दिली.
महानगरपालिकेच्या शिक्षकांनी "कांतारा" हे पात्र असणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये विशाल मनाळे, उमेश युवनाती , स्वप्नील चाबुकस्वार, गंगाधर कांबळे, प्रसन्न निकंबे यांनी सहभाग नोंदविला.