कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 14, 2023 17:44 IST2023-02-14T17:43:50+5:302023-02-14T17:44:23+5:30
सोलापूर - प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी मुंबईकडे पाठविण्याचा ...

कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप
सोलापूर- प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी मुंबईकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही गाडी रविवारी स्पेशल ट्रिप करणार असल्याची माहिती सोलापूररेल्वे प्रशासनाने दिली आहे.
कलबुर्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्स्प्रेस (नंबर ०१४८८) ही कलबुर्गी स्थानकाहून १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता सुटणार आहे. तर या गाडीचे सोलापूर स्थानकावर नऊ वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर कुर्डूवाडीला दहा वाजून दहा मिनिटांनी तर दौंडला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी आमगन होणार आहे. त्यानंतर पुणे, लोणावळा, पनवेल, ठाणे मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर सकाळी सहा वाजता आमगन होणार आहे.