सावित्रीबाईंची वेशभूषा, हातात संविधान घेऊन ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:00 IST2026-04-06T18:00:34+5:302026-04-06T18:00:44+5:30
शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला.

सावित्रीबाईंची वेशभूषा, हातात संविधान घेऊन ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कपाळावर आडवा गंध, खाली चंद्रकोर.. निळी रंगाची नऊवारी साडी अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, आता देशाच्या संविधानाची प्रत घेऊन शिंदेसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभेच्या सदसत्वाची शपथ घेतली. शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला.
राज्यसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी समारंभ राज्यसभेच्या सभागृहात सोमवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. यात सोलापूरची कन्या प्रा. ज्योती वाघमारे यांचाही समावेश होता. शपथविधीला जाण्यापूर्वी महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
शपथविधीसाठी शिंदेसेनेचे राज्यसभेतील गटनेते मिलिंद देवरा, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आवर्जून उपस्थित होते. या समारंभासाठी खासदार वाघमारे यांचे वडील नागनाथ, आई सावित्री, पती धनंजय, बंधू भीमा, बहिण अनिता तुप.धोळे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, गणेश तुपधोळे, रियाज मुलाणी, अविनाश जाधव सागर नवत्रे, नागेश चिप्पा, मेहबूब शेख, संघर्ष वाघमारे आदी उपस्थित होते.
पुन्हा घ्यायला लावली शपथ..
शपथ घेण्यापूर्वी खासदार ज्योती वाघमारे यांनी विविध महापुरुष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख केला. परंतु, प्रोटोकॉलनुसार शपथ घ्यावी असे उपराष्ट्रपतींकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी मराठीतून प्रोटोकॉलनुसार शपथ घेतली. दरम्यान, ज्यांच्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी नामोल्लेख करणे खुश होते त्यानुसार ती कृती केली. मात्र पुन्हा प्रोटोकॉलनुसा शपथ घेतल्याचे खासदार वाघमारे यांनी सांगितले