सहा उद्योजकांकडून जॉब ऑफर, चौदाशे युवकांना मिळेल रोजगार

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 19, 2023 16:32 IST2023-12-19T16:31:34+5:302023-12-19T16:32:10+5:30

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजिला आहे.

Job offer from six entrepreneurs, fourteen hundred youth will get employment in solapur | सहा उद्योजकांकडून जॉब ऑफर, चौदाशे युवकांना मिळेल रोजगार

सहा उद्योजकांकडून जॉब ऑफर, चौदाशे युवकांना मिळेल रोजगार

बाळकृष्ण दोड्डी,सोलापूर : सोलापुरातील सुशिक्षित युवकांसाठी सोलापुरातील सहा उद्योजकांनी जॉब ऑफर देणार असून यातून १४७० युवकांना नोकरीची संधी मिळणार आहे. जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजिला आहे. सदर मेळावा ऑनलाइन होणार आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती केंद्राचे सहायक आयुक्त नलावडे यांनी दिली आहे. मेळाव्यात १० वी, १२ वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, पदवी, बी.कॉम, ट्रेनी अशा प्रकारची एकूण १४७० पेक्षा जास्त रिक्तपदे ६ उद्योजकांनी जाहीर केली आहेत. शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन मेळाव्यात सहभाग घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.

Web Title: Job offer from six entrepreneurs, fourteen hundred youth will get employment in solapur