पलटी झालेल्या ऊसाच्या ट्रेलरला जीपची धडक; बीडमधील दहा प्रवासी जखमी
By Appasaheb.patil | Updated: December 13, 2023 18:55 IST2023-12-13T18:55:02+5:302023-12-13T18:55:20+5:30
भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर जीपने पलटी झालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला जोराची धडक दिली.

पलटी झालेल्या ऊसाच्या ट्रेलरला जीपची धडक; बीडमधील दहा प्रवासी जखमी
सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर जीपने पलटी झालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला जोराची धडक दिली. या धडकेत बीडमधील एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार १३ डिसेंबर २०२३ रोजी घडली.
बिभिषण देविदास मंदे (वय ४५, रा. जहागीर मोघ, ता. धारूर, जि. बीड), आकाश उद्धव मंदे (वय ३५), तुळशीदास भानुदास मंदे (वय ५०), ब्रम्हनाथ देविदास मंदे (वय ३०), रेणुका ब्रम्हनाथ मंदे (वय ४५), कौशल्य आकुड मंदे (वय ३०), पार्वती बिभिषण मंदे (वय ४०), प्रदीप सुर गुंड (वय ३०), विजय कुमार मठपती (वय ३०), छबुराव मंदे (वय ४५) अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, बुधवार १३ डिसेंबर २०२३ रोजी रस्त्याच्या कडेला उसाचा पलटी झालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला जीपने जोराची धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांना तोंडास, हाता, पायास, डोक्यास, कमरेला मार लागला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, जखमींना वेळेत उपचार देण्यासाठी १०३३ रूग्णवाहिकेतून नातेवाईक बळीराम निराडे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सकाळी ६:४० वाजता दाखल केले. या घटनेची नोंद मंद्रुप पेालिस ठाण्यात झाली आहे.