जयभगवान गोयलविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल
By Appasaheb.patil | Updated: January 13, 2020 17:22 IST2020-01-13T17:18:19+5:302020-01-13T17:22:28+5:30
नरेंद्र मोदींची तुलता छत्रपती शिवाजी महाराजांशी; राज्यभरात ठिकठिकाणी व्यक्त केले निषेध

जयभगवान गोयलविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल
सोलापूर : 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते दिनकर नागनाथ जगदाळे (वय ४९ रा़ बुधवार पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पुर्वी सोमवारी सकाळी चार हुतात्मा पुतळा येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने लेखक जयभगवान गोयल याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते़ सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी या पुस्तकाचे तसेच लेखकाच्या छायाचित्रांचे प्रतिकात्मक दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांसह अनेकांनी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्याची भावनाही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.