सोलापूर महापालिका परिवहन समिती सभापतीपदी भाजपचे जय साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:04 IST2020-03-11T12:14:10+5:302020-03-11T14:04:17+5:30
काँग्रेसने कोठेंना तोंडघशी पाडून घेतला बदला; काँग्रेसच्या सदस्यांनी गैरहजर राहून भाजपला दिली साथ

सोलापूर महापालिका परिवहन समिती सभापतीपदी भाजपचे जय साळुंखे
सोलापूर: महापालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी भाजपचे सदस्य जय साळुंखे यांची निवड झाली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी निवडणूक झाली. भाजपकडून साळुंखे तर शिवसेनेकडून परशुराम भिसे यांनी अर्ज भरला होता.
परिवहन समितीमध्ये एकूण १२ सदस्य आहेत. भाजपचे सहा, शिवसेनेचे 3 काँग्रेसचे दोन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. भाजपचे एक सदस्य गैरहजर राहिला तर काँग्रेसचे दोन सदस्य गैरहजर राहिले. एमआयएमचा सदस्य तटस्थ राहिला काँग्रेसच्या सदस्यांनी गैरहजर राहून भाजपला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चमत्कार दिसेल असा दावा केला होता. परंतु, महापौर निवडीत महेश कोठेंनी भाजपला मदत केली होती. आता काँग्रेसच्या नेत्यांनी कोठेंना तोंडघशी पाडले.